उमविचा २८१ कोटी १० लाख रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर : १२ कोटी २३ लाखाची येणार तुट

0
जळगाव :  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन 2017-18 साठीच्या 282 कोटी 10 लाख रूपयांच्या अर्थसंकल्पाला बुधवार दिनांक 15 मार्च रोजी अधिसभेने मान्यता दिली. या अर्थसंकल्पात 12 कोटी 23 लाख रूपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी अधिसभेची बौठक झाली. कुलगुरू प्रा. पाटील यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प वित्त व लेखाअधिकारी प्रा.बी.डी.कज्हाड यांनी सादर केला.
नवीन 40 नाविन्यपूर्ण योजना व उपक्रमांचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. गतवर्षीचा म्हणजे सन 2016-17 चा अर्थसंकल्प 312.47 कोटी रूपयांचा होता त्यात 19 कोटी 89 लाख रूपयांची तूट दर्शविण्यात आली होती. यावर्षीचा अर्थसंकल्प अत्यंत वास्तववादी व विद्यार्थीभिमुख असल्याची प्रतिक्रिया सदस्यांनी सभागृहात व्यक्त केली.
डॉ.कज्हाड यांनी अर्थसंकल्प मांडताना गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील योजना आणि त्यांची कार्यपूर्ती देखील सभागृहात सांगितली. नवीन विद्यापीठ कायद्याचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला असून त्यामुळे निर्माण होणारी नवीन पदे, वेतन, मनुष्यबळ, कार्यालयाची जागा या बाबींसाठी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार नवीन प्राधिकरणे गठीत केली जाणार असून त्या निवडणूक खर्चासाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
प्रस्तावित योजना
नव्या आर्थिक वर्षात विद्याथ्र्यांसाठी युजी/पीजी व्हॅकेशन मेन्टॉरशिप प्रोग्राम ही नवी योजना सुरू केली जाणारअसून सुटीच्या कालावधीत 50 ते 60 विद्याथ्र्यांची नियुक्ती त्यांच्या विषयाशी संबंधित संशोधन प्रकल्पावर करण्यात येईल व त्यासाठी त्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे.
विद्यापीठातील बांधकाम व विकास कामांसाठी 34.70 कोटीची तरतूद करण्यात आली. नव्याने सुरू केल्या जाणाज्या पेटंट सेल व अत्याधुनिक विश्लेषनात्मक उपकरण सुविधा केंद्रासाठी 4 कोटी, विविध प्रशाळांमध्ये सोलर सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी 1 कोटी, स्पिक म्ॉके साठी 5 लाख, लोककला अकादमीसाठी 10 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठात प्रथमच कौशल्य विकास केंद्र स्थापन केले जाणार असून यातून रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे. विद्यापीठ व अमळनेर येथील उपकेंद्र अशा दोन ठिकाणी हा कक्ष सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 35 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
नव्याने स्थापन होणाज्या विद्यापीठ-महाविद्यालये आंतर संवाद कक्षासाठी 5 लाख, रूसा अंतर्गत विविध कार्यशाळा आयोजित करण्यासाठी 10 लाख, तसेच विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या इमारतीत दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी उभारण्यात येणाज्या मदत कक्षासाठी 10 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात 2 कोटी 50 लाख रूपयांची भरघोस तरतूद केली आहे. गतवर्षीपेक्षा ही तरतूद दुप्पट आहे. विशेष म्हणजे या योजनेत भाग घेणाज्या प्रत्येक विद्याथ्र्यांला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विद्याथ्र्यांसाठी शहर बस सेवा सुरू करण्यात आली असून या बसमधून जे विद्यार्थी मासिक पास घेवून प्रवास करतील त्यांना या पासची 50 टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल त्यासाठी 75 लाखाची तरतूद करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशाळा, वसतिगृह येथे जाण्या-येण्यासाठी मोफत इलेक्ट्रीक  रिक्षा सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार असून त्यासाठी 25 लाख तरतूद आहे. महाविद्यालयातील दत्तक योजनेसाठी महाविद्यालयांना अनुदान दिले जाणार असून त्यासाठी 5 लाख, जिल्हानिहाय युवारंग युवक महोत्सवासाठी 20 लाख, विद्यापीठातील विभागीय उपहारगृहासाठी 10 लाख, क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी 20 लाख, स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्वतयारीच्या कार्यशाळेसाठी 10 लाख, विद्यापीठात पर्यावरण पूरक योजनेसाठी 5 लाख, तक्रार निवारण कक्षासाठी 5 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.
नवे अभ्यासक्रम
विद्यापीठात नव्याने योग विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. बी.ए. जनसंवाद हा पदवी अभ्यासक्रम व या अभ्यासक्रमासाठी स्टुडिओ उभारणीसाठी 10 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन वर्षापासून गणित प्रशाळे अंतर्गत एम.एस्सी अॅक्च्युरियल सायन्स हा स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम, भाषा प्रशाळेत पटकथा लेखन पदविका, भाषांतर पदविका हे स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम, व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेत तीन वर्षीय एक्झीक्युटीव्ह एमबीए हा स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम, ग्रंथ विज्ञान विभागांतर्गत एमलीब हा पदव्युत्तर अभ्यासक्रम व डिप्लोमा इन ल्ॉन हा पदविका अभ्यासक्रम, दोन उपकेंद्रात मागणीनुसार एमसीए हा तीन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम स्वयंनिर्वाही तत्वावर सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
विद्यापीठातील परीक्षा कार्यक्षम व सुरक्षित आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पार पाडण्यासाठी ऑनलाईन परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. विद्यापीठ शौक्षणिक प्रशाळेतील प्राध्यापकांना चर्चासत्र, परिषदा यांना उपस्थित राहण्यासाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली जाणारअसून प्रत्येकाला 10 हजार इतकी रक्कम आर्थिक मदत संशोधन कार्य व शौक्षणिक कार्यासाठी देण्यात येणार आहे.
अमळनेर येथील प्रयोगशाळा ते जमीन या उपक्रमाचे केंद्र अधिक बळकट केले जाणार असून शेतकरी व संशोधकांसाठी आवश्यक सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. धुळे, जळगाव व नंदूरबार या जिल्ह्यांच्या ठिकाणी सहा विद्यार्थी सहाय्यता केंद्र उभारण्यात येणार आहे.
विद्यापीठातील परिषदा, चर्चासत्रांचे प्रोसिडींग छपाईसाठी मदत केली जाणार असून त्यासाठी 1 लाखाची तरतूद केली आहे. विज्ञानातील नाविन्यपूर्ण शोधांवर 25 व्याख्याने विद्यापीठात घेतली जाणार आहेत.
ठळक बाबी
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात परिरक्षणासाठी 177.20 कोटी,
योजनांतर्गत विकासासाठी 48.67 कोटी,
विशेष कार्यक्रम / योजनांसाठी 56.23 कोटी अशी एकुण खर्चासाठी 282.10 कोटीची तरतूद आहे.
उत्पन्नाची तरतूद 269.86 कोटी अशी दर्शविण्यात आली आहे. खर्चात बचत करून तूट शुन्यावर आणण्याचा संकल्प अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
विद्यार्थी कल्याण विभागाच्या सहाय्य योजनांसाठी 8.13 कोटी, गृह, संगणक, वाहन कर्जासाठी कर्ज व अग्रीम यासाठी 14.25 कोटी, शौक्षणिक उपकरणासाठी 4.92 कोटी, कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेसाठी 50 लाख व पेटंट प्रोत्साहन योजनेसाठी 25 लाख, प्रताप तत्वज्ञान केंद्रासाठी 25 लाख, कम्युनिटी रेडीओसाठी 50 लाख अशी काही प्रमुख वौशिष्टे अर्थसंकल्पाची आहेत.
डॉ.कज्हाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर डॉ. ए.यु.बोरसे, डॉ.शांताराम बडगुजर, डॉ.सीमा जोशी, डॉ.सतिष कोल्हे, अशोक शिंपी, डॉ.रत्नमाला बेंद्रे यांनी अर्थसंकल्पावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना काही सूचनाही केल्या. हा अर्थसंकल्प विद्यार्थी केंद्रीत व सर्वांना सारखी संधी उपलब्ध करून देणारा असल्याची भावना डॉ.बोरसे यांनी व्यक्त केली.
सदस्यांनी केलेल्या सर्व सूचनांचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी स्वागत करून त्यांचा योग्य तो विचार करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. चर्चेनंतर अर्थसंकल्पाला सभागृहाने मान्यता दिली.
या बौठकीत सन 2015-16 चा लेखा परिक्षण अहवाल, विद्यापीठाचा सन 2015-16 चा वार्षिक अहवाल यांनाही मंजूरी देण्यात आली. विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ 8 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली.
बौठकीच्या प्रारंभी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य सुशीलाबेन शहा, माजी उपकुलसचिव डी.डी.पाटील, कर्मचारी श्रीधर पवार, आकाश चक्रनारायण यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बौठकीचे सुत्रसंचालन प्र.कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले व शेवटी आभार मानले.

LEAVE A REPLY

*