Type to search

नंदुरबार

उभादगड व धांद्रे गावांना अद्यापही महसूली दर्जा नाही

Share

जयनगर | वार्ताहर – शहादा तालुक्यातील उभा दगड व धांद्रे खुर्दे या दोन गावांना अद्यापही महसुली दर्जा नसल्याने ग्रामपंचायत नाही व ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. त्यामुळे या दोन्ही गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा देण्यात यावा अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे.

यावेळी महात्मा ज्योतीबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, माजी उपसरपंच अर्जुन सोनवणे, विष्णू दसरथ भिल, नाना सोनवणे, देविदास भिल, जितेंद्र चंद्रसिंग भिल, डोंगर पावरा, प्रेमच पद्मा वंजारा, वन हक्क समितीचे अध्यक्ष रामसिंग मोहन ठाकरे, इंदर सोनवणे, दगडू ठाकरे, बल्सिंग ठाकरे, मख्खन पवार, विजय ठाकरे, चंदन ठाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

उभा दगड व धांद्रे खुर्द गावांना स्वातंत्र्याच्या ७२ वर्षापर्यंत ग्रामपंचायत कार्यालय अथवा सदस्यदेखील घेता येत नाही. संबंधित दोन्ही गावातील गावकर्‍यांनी आजपर्यंत ग्रामपंचायतीला मतदान केले नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार अथवा ग्रामसभा काय असते हेदेखील माहीत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावांमध्ये विकास कामांना देखील निधी मिळत नसल्याच्या गावकर्‍यांच्या आरोप आहे

माजी मंत्री व आमदार आमच्या दोन्ही गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा मिळवून द्यावा व दोन्ही अपेक्षित गावांना मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!