‘उबर’ची आता खाद्यपदार्थांच्या व्यावसायात उडी; 200 रेस्टॉरंटसोबत करार

0

कॅब सेवा देणारी ‘उबर’ कंपनी आता खाद्यपदार्थांच्या व्यावसायातही पाऊल ठेवत आहे. ‘उबरईट्स’ या उपक्रमाच्या अंतर्गत उबर कंपनी खाद्यपदार्थ घरपोच पुरवण्याची नवी सेवा सुरु करणार आहे. या सेवेसाठी उबर कंपनीने सुमारे 200 रेस्टॉरंटसोबत करार केला आहे.   

उबरईट्स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड यांनी सांगितले, “भारतात उबरईट्स सुरु करणं म्हणजे कंपनीच्या जागतिक स्तरावरील विस्ताराच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. मुंबईमधून या सेवेला सुरुवात केली जाणार आहे.”

मुंबईत जरी ‘उबरईट्स’ सेवेची सुरुवात होत असली, तरी आगामी काळात दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता यांसारख्या भारतातील मेट्रोसिटीमध्ये ही सेवा वाढवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*