Type to search

उपवास: केव्हा, किती कुणी करावा?

आरोग्यदूत

उपवास: केव्हा, किती कुणी करावा?

Share

लंघनाचे अनुभव :
40 वर्षे वयाचा पुरुष रुग्ण, दोन्ही पाय सडल्याप्रमाणे झालेत. जखम वाहताहेत, खाज, आग होतेय. स्त्रावामुळे पायजमा चिकटलेला. रुग्णाला अ‍ॅडमिट करून लंघन चिकित्सा दिली. दुसर्‍या दिवसापासून, स्त्राव, खाज कमी झाले. चौथ्या दिवसापर्यंत जखमा पूर्ण कोरड्या झाल्या. हा केवळ लंघनाचा प्रताप. या रुग्णाला इतर काहीही औषधोपचार नव्हते.

आणखी एक त्वचा रुग्ण. नागिनचा एक प्रकार. फोड, आग, दुखणे भयंकर दोन दिवसांच्या पूर्ण लंघनाने नद्या कोरड्या व्हाव्यात, त्याप्रमाणे वाहरे, दुखणे आटले. शरीरातील कुठल्याही असताना लंघन हा पहिला उपाय होय.

वेरिकोस वेईन्सचा एक रुग्ण. ऑपरेशन झालेले परंतु अयशस्वी. पायाला त्रास झालेला. जखमा वाहताहेत. 2 दिवस पूर्ण लंघन. खायला केवळ लाह्या आणि मुगाचे कढण. जखमेवर आपोआप खपली धरली.

2 वर्षांचा अपस्मार. मिर्गीचा एक रुग्ण. रात्री बारा वाजता झटके येण्याच्या स्थितीत अ‍ॅडमिट झाला. एवढ्या रात्री जवळ उपलब्ध काही औषधांनी उपचार सुरू केले. औषधे 1-1 थेंब जातेय तसा तसा कफ सुटा होऊन पुढचे धूसर चित्र आणखी स्पष्ट होतेय. महत्त्वाचा उपाय सुरूच होता. त्याला केवळ लाह्या खायला दिल्या. सकाळी 10 वाजता प्रणवचा हसण्या, खिदळण्याचा आवाज येतोय. त्याच्या आईला विचारले, ‘प्रणवला काही खायला दिले की नाही.’ तर आई म्हणते, ‘त्याने काही खाल्ले की, पुन्हा त्याला त्रास होईल, अशी भीती मला वाटते. उपाशी आहे तर बरा खेळतोय.’ हीच ती लंघनाची अवस्था, जी प्रणवच्या आईला कळाली. यापूर्वी हे बाळ अशावेळी 2 दिवस आयसीयूमध्ये असायची. यावेळी बदल काही वेगळाच होता. भुकेलेले पोट मेंदूला उत्तेजित करते. जगातील कुठलीच क्रांती ही भरल्यापोटी झालेली नाही. एका रशियन मासिकामध्ये तेथे वेड्यांच्या इस्पितलात लंघनाचा उपाय सुचविल्याचेच लिहिले होते. त्याची कारणमिमांसा हीच असावी.
जुलाब होणे, उलटी होणे, मळमळणे, ताप हे तर लंघनाचे हक्काचे आजार. या व्याधीत बहुतेकदा काहीही औषधाची गरज नसते. शिवाय उपवास, परंतु अशावेळी नेहमीच खाणेपिणे सोबत औषध परिणामी आजारसुद्धा तिघेही एकत्र नांदत असतात. हा आपल्या सर्वांचा अनुभव.

लंघन कुणी, केव्हा करावे?
लंघन हा खरेच महान उपाय होय. हे आपल्याला पटले असेल तर पुढचा प्रश्न आहे. लंघन कुठल्या आजारामध्ये उपयुक्त आहे. प्रमेह, आमदोष, ताप, त्वचारुग्ण ज्यामध्ये स्त्राव, खाज, फोड असतात अशावेळी लंघन हा पहिला उपाय होय. जसे की नागीण, वगैरे शिरारोग, घशाचे विकार, डोळ्यांचे विकार ह्या आजारांमध्ये उपवास प्रशस्त होय. कारण आमाशय (आतड्याचा सर्वात वरील भाग) च्या जवळील सर्व आजारामध्ये लंघन उपयुक्त होय. लंघनाचे दहा प्रकार होत. त्यामध्ये पंचकर्माचासुद्धा समावेश होतो. परंतु वय, बल, साधनांची अनुपलब्धी या काही अडचणींमुळे पंचकर्म नाहीच करायला जमले तरी उपवास का होईना निदान करायला हवा. अशावेळी नको पंचकर्माचे पुण्यार्जन, निदान खाण्याचे पाप तर घडायला नको ही भूमिका महत्त्वाची.

असे आजार म्हणजे कफ, पित्ताची वाढ, आमदोष, ताप, उलटी, जुलाब, पोटात जडपणा, अंग जड वाटणे, ढेकर, मळमळ, बेचवपणा हे होत. उलट्या होताना खाल्ले आणि त्यामुळे परत उलट्या झाल्यात वा जुलाब होताच काही खाल्ल की परत धार लागली हा अनुभव कायम घेतो. ही सर्व यादी आपल्या लक्षात राहिली नाही तरी चालेल. परंतु त्यामागील गोम कळणे महत्त्वाचे. ती गल म्हणजे ‘जेऊ की नको’ असा जेव्हा केव्हा तुम्हाला प्रश्न पडेल त्याचे कायम उत्तर नाही हे असेल तेव्हा लंघनाची, उपवासाची गरज होय.

ऋतूच्या बाबतीत शिशिर अर्थात जेव्हा बोचरी थंडी असते तो डिसेंबर, जानेवारी महिना हा लंघनाची ठेव होय. या दिवसात फारसे आजार आढळत नाही. होणारे आजार बहुतेकदा गंभीर नसतात. त्यामुळे पंचकर्माची, औषधांची फारशी गरज नसते. म्हणून केवळ लंघनावर निभावते. या ऋतूत आढळणार्‍या कुठल्याही आजारावर काही तासांचे वा एखाद्या दिवसाचे लंघन करून बघा तेवढेच पुरेसे ठरेल. आरोग्य भास्करात इच्छेत् एवढीच त्यावेळी प्रार्थना.

लंघन किती, कसे करावे?
हा खरा प्रॅक्टीकल प्रश्न तेव्हा लंघनाचा सल्ला देणार्‍याने प्रथम स्वत: लंघन करून पहावे. थोडे उपाशी राहून अनुभव घ्यावा. लंघनाला योग्य रुग्ण निवडल्यानंतर उपवास सुरू झाल्यानंतर कुठे थांबावे, त्याची लक्षणे रुग्णाला स्वत:ला कळतात ती येणेप्रमाणे.

इंद्रियाची प्रसन्नता अनुभवास येऊ लागते. समजा ज्वरामध्ये लंघन सुरू केले की पुरेसा लंघन झाले म्हणजे प्रथम लघवी साफ होते. त्यानंतर गॅस येऊ लागतात. काही वेळातच शौचास सटकून होणार की, समजायचे दोष लंघनाने पचले. एव्हाना ताप हमखास उतरलेला असेल. त्यानंतर अंग हलके वाटून जिभेस रुची वाटू लागते व काही खाण्याची इच्छा. भूक लागते. लंघनाची विशेषता ही की, येथे केवळ भूक लागत नाही. तर भूक आणि तहान जोडीने लागतात. हृदयात स्वच्छ वाटू लागते. ढेकर चांगल्या प्रकारे येऊ लागतात. घसा स्वच्छ वाटू लागतो. ज्य व्याधी तक्रारीसाठी लंघन, उपवास केला तो आजार मावळू लागतो. जसे ताप नाहीसा होतो. अजीर्ण कमी वाटू लागते. एकप्रकारे उत्साह वाटू लागतो. अन्न न घेता सुद्धा उत्साह, हुशारी वाटते हे आपल्या कल्पनेत बसत नाही. जसे अन्न खाण्याने उत्साह वाटतो तसा लंघन करण्याने वाटणारा उत्साह अवर्णनीय आहे. याउलट लंघनाची गरज असताना जर मोहवश आहार घेतला तर थकवा कमी होण्याऐवजी वाढतच जातो. खावून पिवून थकवा असतो. लंघनाने सुस्ती, आळसटपणा नाहीसा होतो. अन्न न मिळणारे लोक प्रचंड क्रांत्या करून जातात. लंघनामुळे मिळणारा आनंद अनुभवण्यासारखा आहे.

ही सर्व लक्षणे ज्याची त्याला कळतात. परंतु ती लक्षण किती तासांच्या वा दिवसांच्या उपवासानंतर आढळतील, हे मात्र शरीरात दोष किती प्रमाणात आहे. अर्थात आजाराचे बल किती आहे यावर अवलंबून असते. मला एकदा शिशिरात ताप आला. गरम पाणी पित होतो. त्या दरम्यानच मला ताप आला. यावेळी दोष भरपूर होते. मीच वाढवले होते. अडथळा मोठा होता. मी पाच दिवस पूर्ण उपाशी होतो. पहाटे दिवस उगवावा, अंधारातून उजेडाकडे प्रवास व्हावा, त्याप्रमाणे पाचव्या दिवशी रस्ता खुलला, लंघनाचे योग्य लक्षण मिळाले. ताप उतरला.

जास्त लंघनाचे दुष्परिणाम
काही वेळा रुग्णाकडून तसेच वैद्याकडून अज्ञानवश ही मयोदा ओलांडली जाते. कारण आम्ही उंटावरचे शहाणे. सम्यक् लंघनाचे लक्षण तपासायला आम्ही तेथे उपस्थित नसतो म्हणून. यानंतर लंघनाने रुग्णाजवळ शिल्लक बलाची पुंजी खुर्ची पडते त्याची लक्षणे पुढे बघूयात.
वैद्य सौ. अर्चना तोंडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!