उपराष्ट्रपतींनी मायावतींचा राजीनामा स्वीकारला

0

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी गुरूवारी बहुजन समाज पक्षाच्या (बसप) मायावती यांचा राजीनामा स्वीकारला.

सत्ताधारी पक्षाकडून राज्यसभेत बोलू दिले जात नसल्याचे सांगत मंगळवारी मायावती यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता.

रालोआ सरकारच्या काळात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आपल्याला राज्यसभेत बोलून दिले जात नसल्याचा आरोप यावेळी मायावतींनी केला होता. त्या सभागृहात उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा मायावती राज्यसभेत उपस्थित करु पाहत होत्या. मात्र, त्यांच्या मनानुसार त्यांना बोलण्यासाठी संधी दिली गेली नाही. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

LEAVE A REPLY

*