उपमहापौरांचा बोलविता धनी वेगळाच! : दिलीप सातपुते

0

 शहर विकासात आडकाठीचा त्यांचा उद्देश

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन निधीतून करावयाची कामे सुचविण्याचा महापौरांना दिलेले सर्वाधिकारास उमहापौरांचा विरोध म्हणजे शहर विकासाला अडकाठी असल्याचे सांगत त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. तोही नगरकरांना कळला असेल असे प्रत्युत्तर सेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिले आहे.
शासन निधीतून करावयाची कामे यासंदर्भात महापौर सुरेखा कदम यांना दिलेल्या सर्वाधिकाराला उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आक्षेप घेतला आहे. त्याला सातपुते यांनी उत्तर दिले आहे. ज्या सभेत हे अधिकार देण्यात आले, त्या सभेला उपमहापौर उपस्थित होते. त्यावेळी ते गप्प कसे राहिले असा सवाल करत त्यांच्याच सांगण्यावरून महापौरांना उपमहापौर निधीत 25 लाखाची वाढ करत तो 75 लाख रुपये इतका केला. उपमहापौर छिंदम यांनी सुचविलेली दीड कोटी रुपयांची कामे 2015-16 च्या शासन निधीतून मंजूर आहेत. त्यातील काही प्रगतीपथावर असून काही आयुक्तांच्या मंजुरीसाठी आहेत. शासनाकडून मिळणार्‍या निधीतून नागरी सुविधांची कामे शहरात होत असतात. पण त्यालाच विरोध म्हणजे त्यांचा शहर विकासालाच अडकाठी असल्याचे दिसते. प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध करणार्‍या उपमहापौर छिंदम हे विकासाला चालना मिळेल या दृष्टीने प्रयत्न करत नसल्याची खंत सातपुते यांनी व्यक्त केली आहे. हा विरोध छिंदम यांनी कोणत्या हेतुने केला अन् त्यांचा बोलविता धनी कोण? हे नगरकरांना कळून चुकले असल्याचे सातपुते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*