उपनगरला अपघातात महिला ठार

0
नाशिकरोड | दि. २ प्रतिनिधी- नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर नाक्यावर ट्रॅव्हल्सच्या मीनी बसखाली सापडून देवळालीगाव येथे राहणारी ४० वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली.
या घटनेमुळे द्वारका ते नेहरूनगर दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने ही गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

याबाबतचे वृत्त असे की, देवळालीगाव येथील सुंदरनगर परिसरात राहणारी कमळाबाई सुकदेव कुमावत ही महिला तिच्या मुलासोबत उपनगर नाक्यावरून जात असताना रस्ता ओलांडत होती.

या दरम्यान नाशिकरोडहून नाशिककडे जाणारी ट्रॅव्हल्स मीनी बस क्र. एमएच १३ एक्स ९०३ हिच्याखाली ही महिला सापडल्याने ती जागीच ठार झाली.

अपघातानंतर समोरच आपल्या आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे बघताच मुलगा बेशुद्ध पडला. अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. तसेच भर रस्त्यात अपघात घडल्याने या ठिकाणी येणार्‍या जाणार्‍या नागरिकांनी व वाहनचालकांनी मोठी गर्दी केली.

सदर घटना उपनगर पोलिसांना समजताच तातडीने वपोनि बाजीराव महाजन यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटने प्रकरणी उपनगर पोलिसांत उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी बससह चालकाला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

*