उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांसाठी रस्तारोको

0
नवापूर । दि.14 । प्रतिनिधी-नवापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाना सुविधा मिळत नसल्याबाबत आज भिलीस्थान टाईगर सेनेमार्फत मोर्चा काढुन उपजिल्हारुग्णालया समोर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी पुतळयाला बी.टी.एस. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रविंद्र पाडवी व बी.टी.एस.चे युवा अध्यक्ष अजय गावीत यांनी पुष्पहार अर्पण करुन आई देवमोगरा मातेचे पुजन करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आला.
मोर्चा लाईट बाजार येथुन बाबासाहेब आंबेडकर पुतळा, साईमंदीर रोड, स्व.हेमंलताताई वळवी पुतळा, नॅशनल हार्यवे, उपजिल्हा रुग्णालयाजवळ येऊन महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसिलदार प्रमोद वसावे, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील शल्यचिकित्सक डॉ.राजेश वसावे, डॉ.राजेश वळवी, नवापुर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.अविनाश मावची आदी उपस्थित होते.

यावेळी भिलीस्थान टाईगर सेनेचे अध्यक्ष रविंद्र पाडवी व युवा सेनेचे अध्यक्ष अजय गावीत यांनी जिीतल्हा रूगणालयाची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही व्हावी व यात दोषी असलेल्या वेद्यकीय अधिकायार्ंवर कडक कार्यवाही व्हावी.

ही मागाण्ी पुर्ण होत नाही तोपर्यत रास्ता रोको करु असा पवित्रा धरला या नंतर तहसिलदार प्रमोद वसावे व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी तहसिलदार यांनी 13 मागण्याचे लेखी आश्वसन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पाडवी, अजय गावीत, धवल चौधरी, वाडया गावीत, अमोल वसावे, दिनेश मावची, नितेश सोलंकी, विजय गावीत, बटेसिंग नाईक, भद्रेश वसावा, विनेश गावीत, संजय मावची, स्टिपन वसावे, राजेंद्र पाडवी, प्रल्हाद गावीत, दिविसिंग वळवी, संजय माळी, रसिलाल कोकणी, धनसिंग गावीत, महेश मावची यांनी परीश्रम घेतले. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा, संतोष भंडारे, दिपक पाटील, ताथु निकम, संगिता कदम, पो.का.निजाम पाडवी, मोहन साळवे, दिलीप चौरे, योगेश थोरात, महेंद्र नगराळे, साहेबराव खाडेकर, जितेंद्र तोरवणे, अनिल राठोड, रितेश इंदवे, प्रविन मोरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रास्ता रोको आंदोलन 1 तास सुरु असल्यामुळे महामार्गावर वाहनांचा मोठया रांगा लागल्या होत्या.

 

LEAVE A REPLY

*