आज बारावीचा ऑनलाईन निकाल; असा बघा निकाल

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाबाबत महत्वपूर्ण घोषणा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे यांनी केली आहे.

बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज ३० मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर बारावीच्या निकालाच्या तारखांना उधान आले होते.

अखेर राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे. यंदा राज्यात  राज्य मंडळातर्फे  १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली.

त्यात ८ लाख ४८ हजार ९२९ मुलांचा तर 6 लाख ५६ हजार ४३६ मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या ५ लाख ५९ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या ५ लाख ९ हजार १२४ विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या ३ लाख ७३ हजार ८७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या ६२ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.  गेल्या वर्षी २५ मे रोजी बारावीचा ऑनलाईन  जाहीर झालेला   निकाल यंदा ३० मे रोजी होणार आहे.

 

आज दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येतील.
www.mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org

या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

 संबंधित बातम्या :

येत्या सोमवारी बारावीच्या निकालाची तारीख होणार जाहीर

LEAVE A REPLY

*