उद्यानाच्या दुसर्‍या बाजूला ‘बहिणाबाई चौक’ नामकरणाचा प्रस्ताव

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-बहिणाबाई उद्यानाच्या एका बाजूला महेश चौक असे नामकरण नुकतेच करण्यात आले. त्यामुळे उद्यानाच्या दुसर्‍या बाजूला कवयित्री बहिणाबाई चौक असे नामकरण करुन फलक लावण्यासाठी नगरसेविका सीमा भोळे यांनी दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासह 16 विषयावर चर्चा करण्यासाठी मनपाची दि.20 रोजी महासभा होणार आहे.
मनपाची महासभा दि.20 रोजी सकाळी 11 वाजता महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बहीराबाई उद्यनाजवळ रिंगरोडवरील चौकाला महेश चौक तर रिंग रोडचे महेश मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे.
त्यानतंर आता पुन्हा एम. जे. कॉलेज ते भास्कर मार्केट या रस्तावरील बहीणाबाई उद्यानाच्या जवळील रिंगरोडच्या चौकाला कवयत्रि बहीणाबाई चौक असल्याने तेथे तसा फलक लावण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी असा प्रस्ताव नगरसेविका सीमा भोळे यांनी दिला आहे.

यावर या महासभेत चर्चा होणार आहे. 14 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 26 लाख 68 हजार रुपये स्वच्छ भारत अभियानाच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत निर्णय घेणे, अग्निशमन व आणिबाणी सेवेसाठी टाटा 1613 वाहन घेवून त्यावर फायर फायटर यंत्रणा बसविण्याच्या 46 लाख 6 हजार 520 रुपयांच्या खर्चाला मान्यता देणे, बालवाड्यांमधील शिक्षिका व मदतनीस यांच्या मानधनाच्या खर्चाला मान्यता देणे, जळगावात उपजिविका केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेणे, रोंजदारी कर्मचार्‍यांना समान वेतन देण्याबाबत निर्णय घेणे, महापालिकेची 48 क्रमांकाची शाळा विवेकानंद प्रतिष्ठान यांना देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मनपात सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव
सतरा मजली इमारतीमध्ये सर्व मजल्यांवर सीसीटीव्ही कार्यान्वीत करण्याचा प्रस्ताव आहे. यासह लीफ्टच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण ठरविणे, मनपाची अपूर्ण घरकुले पंतप्रधान आवास योजनेतंर्गत समाविष्ठ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासह 16 विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*