उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशेजारील हनमंतखोरा वनक्षेत्र जळून खाक

0

जळगाव :   उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या हनमंतखोरा वनक्षेत्रात गुरुवारी सायंकाळी अचानक आग लागली. हवेचा जोर असल्यामुळे ही आग पसरत जाऊन सुमारे २०० एकर क्षेत्रावर हे अग्नितांडव सुरू होते. ही आग सहा अग्निशमन बंबांच्या साहाय्याने दोन तास प्रयत्न केल्यानंतर साडेसात वाजेपर्यंत नियंत्रणात आणण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसच्या मागे व मुलींच्या वसतीगृहामागे असलेल्या हनमंत खोऱ्याच्या वनक्षेत्रात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक आग लागली. वनक्षेत्राच्या शेजारील शेतात बांधावरील काड्या जाळल्यामुळे त्याच्या ठिणग्या हवेत उडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हवेचा जोर असल्यामुळे काही मिनिटांतच आगीचा भडका उडाला. गेस्ट रूमच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बात येताच त्यांनी जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांना त्यांनी माहिती दिली. त्यांनी प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आणून दिल्यानंतर महापालिका, जैन समूह, एरंडोल नगरपालिकेकडून अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले.

या आगीने अवघ्या तासाभरातच सुमारे २०० एकर वनक्षेत्र जाळून खाक केले. तब्बल दोन ते सव्वा दोन तासाने आगीवर सहा बंबांच्या साहाय्याने नियंत्रण मिळविण्यात आले. आगीची माहिती मिळताच कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्यासह उमविचे अधिकारी घटनास्थळी आले. ते आग नियंत्रणात येईपर्यंत थांबून होते.

LEAVE A REPLY

*