उत्तर प्रदेश : विधानसभेत सापडली स्फोटके, राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी

0

उत्तर प्रदेशमधील विधानसभेत बुधवारी स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभेत सापडलेली स्फोटकं हा दहशतवादी हल्ल्याचा कट असून यामागे कोणाचा हात आहे याचा पर्दाफाश झालाच पाहिजे असे योगी आदित्यनाथांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेश विधानसभेत बुधवारी समाजवादी पक्षाच्या आमदाराच्या आसनाखाली एका पाकिटामध्ये स्फोटक पदार्थ सापडली होती.

शुक्रवारी विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

आदित्यनाथ म्हणाले, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात या स्फोटक पदार्थाचे नाव पीइटीएन (PETN) असल्याचे निष्पन्न झाले आहे. 150 ग्रॅम पीईटीएन सापडले असून संपूर्ण विधानसभा स्फोटात उडवण्यासाठी 500 ग्रॅम पीईटीएनची गरज असते असे त्यांनी सांगितले. विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडणे हा गंभीर प्रकार आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. एनआयएमार्फतच याची चौकशी झाली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

 

बुधवारी दुपारीच विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडले होते. मात्र सचिवालयाच्या कामकाजाची वेळ संपेपर्यंत हा प्रकार उघड करण्यात आला नाही. कर्मचारी घरी परतल्यावर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना विधानसभेत पाचारण करण्यात आले. यानंतर ही पावडर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*