उत्तर प्रदेश विधानसभेत सापडलेल्या संशयित पावडरमध्ये स्फोटके नव्हतीच; आग्रा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल

0

उत्तर प्रदेश विधानसभेत दि. १२ जुलै रोजी आमदाराच्या आसनाखालून मिळालेल्या पीइटीएन (PETN) पावडरमध्ये स्फोटके असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने त्याचे नमुने आग्रा आणि हैदराबादला पाठवले होते. आग्राच्या प्रयोगशाळेने आपला अहवाल पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला आहे.

आग्रा न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार,  त्या संशयित पावडरमध्ये स्फोटके नसल्याची माहिती समोर येत आहे.

या पावडरच्या तपासासाठी चार वरिष्ठ वैज्ञानिकांची नेमणूक करण्यात आली होती.

प्रयोगशाळेचे उपसंचालक ए.के.मित्तल यांच्या नेतृत्वाखाली या पावडरचा तपास करण्यात आला. या पथकात स्फोटकांचा तपास करणाऱ्या तज्ज्ञांचाही समावेश होता.

LEAVE A REPLY

*