उत्तर प्रदेश : प्राथमिक शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा होणार; स्वच्छतेबाबत जागृती करणार

0

रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

रविवार असला तरीही सर्व शाळा सुरू राहणार असून विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात १.६० लाख प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनुपमा जैस्वाल यांनी दिली.

मोदींच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित आमदारांना दिल्या.

स्वच्छतेचा प्रसार आणि मुलांमध्ये त्याबाबत जागृती करणे हा शाळांमध्ये पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन म्हणाले.

LEAVE A REPLY

*