उत्तर न सांगितल्याने विद्यार्थ्याला मारहाण

0

नाशिकरोड | दि. २८ प्रतिनिधी- परीक्षा सुरू असताना आपल्याला पेपर दाखवला नाही म्हणून राग आलेल्या बारावीच्या एका विद्यार्थ्याने दुसर्‍याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे खळबळ उडाली. सदर प्रकार बिटको महाविद्यालयातील परीक्षा केंद्राबाहेर घडला.

कालपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून काल पहिल्या दिवशी ११ ते दुपारी २ या वेळेत इंग्रजीचा पेपर होता. पेपर सुरु असताना जयभवानीरोडचा रहिवासी असणार्‍या एका विद्यार्थ्याने दुसर्‍याकडे पेपर दाखविण्याची मागणी केली.

ती दुसर्‍याने फेटाळली. पेपर सुटल्यानंतर जयभवानीरोडच्या विद्यार्थ्याने आपल्या साथीदारांना बोलावून दुसर्‍या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याच्या पालकांनी उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. हे विद्यार्थी ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्या शाळेनेही कडक समज दिली आहे.

दुसर्‍या गटाच्या मुलांनी राजकीय नेते आणून तडजोडीचा प्रयत्न केला. पोलिसांनी नोंद करुन घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

*