उड्डाणपूलावर ट्रक अपघातात दोन ठार

0

नाशिक | दि. ११ प्रतिनिधी- पंचर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव आलेला ट्रक आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना आज पहाटे मुंबई- आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर घडली. मृतांमध्ये ट्रकवरील चालक व क्लीनर दोघांचा समावेश आहे.

महेश गंगासिंग (वय ३० रा. भिंडगाव मध्यप्रदेश) व त्याचा सहकारी क्लिनर (नाव समजू शकले नाही) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावरून गव्हाची वाहतूक करणारा ट्रक (एम.एच १८ एए ९९४८) पंचर झाला.

उड्डाणपुलावरच ट्रक महामार्गाच्या लगत उभा करून चालक गंगासिंग व त्याचा क्लिनर चाक खोलण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान नाशिककडून आडगावच्या दिशेने जात असलेला दुसरा ट्रक (यूपी ७५ एम ५३५३) हा अतिशय भरधाव वेगाने आला. त्यास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रक दिसून आला नाही आहे त्याच वेगात तो भरधाव ट्रक जावून उभ्या असलेल्या ट्रकवर आदळला. यामुळे ट्रकचे कॅबिन पूर्णपणे चक्काचूर झाले.

ट्रकमधील चालक व क्लिनर असे दोघेही यात गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच मुंबई नाका व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जखमींना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु अतिरक्तस्त्राव झालेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*