उघड्यावर शौच करणार्‍या ४० जणांवर कारवाई – यावल न.प.ची धडक मोहिम

0

यावल | प्रतिनिधी :  येथे नगरपरिषदेतर्ङ्गे उघड्यावर शौचास बसणार्‍या ४० च्या जवळपास जणांना सकाळी ५ ते ७ च्या दरम्यान पकडून पोलिस स्टेशनमध्ये आणून मुंबई पोलिस अधिनियम ११५ अ/११७ नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येवून त्यांना पीएसआय अशोक अहिरे यांनी कोर्टासमोर उभे केले असता २१ जणांना प्रत्येकी २०० रूपये, १७ जणांना प्रत्येकी १५० व ४ लोकांना १०० रूपये असा एकूण ७ हजार १५० रूपये दंड वसुल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

यावल न.पा.ने गेल्या १ वर्षापासुन आपले शहर हगणदारी मुक्त व्हावे, यासाठी वारंवार दवंड्या, वृत्तपत्रांमधून जनजागृती व जाहिराती देण्यात आल्या होत्या. सुचना करूनही बहुतांश नागरिकांनी शासनाकडून शौचालय बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. घरोघरी जावून अर्ज भरण्यासाठी अवगत केले. तरीही अर्ज भरण्याची नागरिकांची इच्छा होत नाही.

शासनाने हगणदारी मुक्त शहर करण्यार्‍या न.प.ला प्रोत्साहनपर काही अनुदान देण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव व आरोग्य निरिक्षक रमाकांत मोरे व सङ्गाई कामगार मुकादम दुर्गादास चव्हाण, शे.मोमीन, शिवदास घारू, सतीष चव्हाण, नितीन भालेराव, संदीप गजरे सह स्टाङ्गने माहिम राबविली व पोकॉ जाकिर अली सैयद हसन, विजय परदेशी, सुमीत बाविस्कर, संदीप कोळी यांनी बंदोबस्त ठेवून ४२ जणांना उघड्यावर शौचास बसतांना पकडले.

यावल शहरात ९५० वैयक्तिक शौचालय बांधकामे झालीत ४५० चे काम प्रगतीपथावर आहेत. उर्वरित राहिलेले नागरिकांसाठी आवाहन करूनही जागेचा बडगा पुढे करून व अतिक्रमणात राहतो या कारणावरून अर्ज भरू देत नाहीत. अनेकांचे खड्डे खोदले गेले आहेत. त्यांना अनुदानाचा चेक मिळाला नसून मिस्तरी लोक पैशांशिवाय कामे करायला तयार नाहीत.

बहुतांश नागरिक हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवितात याकडे प्रत्यक्षात न.पा. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनीच लक्ष घालावे, अशी ओरड पोलिस स्टेशन समोर पकडून आणलेल्या काही लोकांनी केली.

या कारवाई वेळी सर्व नगरसेवकांना ज्या दिवशी नवीन सत्तारूढ झालेल्या नगराध्यक्षा सौ.सुरेखा कोळी यांनी पद्भार स्वीकारला तेव्हा मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी शासनाचे हगणदारी मुक्तीचे परिपत्रक वाचून दाखविले होते.

याकडे मात्र नगरसेवकांचे अक्षम्य दुर्लक्ष असून या कारवाईवेळी २१ नगरसेवकांतून एकमेव अतुल पाटील हे पोलिस स्टेशनला हजर होते अन्य नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या संपर्कात होते.

नगराध्यक्ष पती शरद कोळी, दिपक बेहेडे यांनी पोलिस स्टेशनला येवून विचारपूस केली. एपीआय योगेश तांदळे, पीएसआय अशोक अहिरे यांनी सहभाग घेवून संबंधितांना न्यायालयात हजर केले.

न्या. शेख यांनी २१ लोकांना तर न्या. श्रीमती धुरवे यांनी २१जणांवर दंडात्मक कारवाई केली. कारवाई पुढे अशीच चालू राहणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*