उगावला द्राक्ष व्यापाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचे आंदोलन

0

नाशिक : निफाड तालुक्यातील उगावचे द्राक्ष व्यापारी रवी वाघ यांचा आज पैशांच्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला.

या प्रकरणी त्यांची पत्नी व दोन मुलांसह नातेवाईकांनी निफाडच्या प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

द्राक्षाच्या पैशांच्या देवाणघेवाणीतून ही मारहाण झाल्याचे समजते. उगाव येथील द्राक्ष व्यापारी रवी वाघ यांनी द्राक्षाचे पेमेंट दिले. त्यानंतर पूर्वी दिलेल्या चेकची मागणी केल्याने बाळासाहेब जगन्नाथ ढोमसे, कल्याण विजय ढोमसे, पंडीत बाळासाहेब ढोमसे, शिवलाल भाऊसाहेब ढोमसे यांनी जबर मारहाण केली.

तसेच कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये रवी वाघ हे मरण पावल्याचे सांगितले जातेय. यामुळे द्राक्ष व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरल्याने ते घाबरुन पलायन करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान या पूर्वी द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फसविण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यानंतर हे व्यापारी फरार होत असत. त्याच रागातून ही घटना घडली किंवा कसे? याविषयी तर्क वितर्क सुरू आहेत.

LEAVE A REPLY

*