ई- मृत्युपत्राचा वापर कसा कराल?

0

ई -विल सुविधा देणार्‍या वेब पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन आयडी पासवर्ड तयार करा. साधारणत: ई-विलसाठी तीन ते पाच हजारांपर्यंत शुल्क आकारले जाते. हे शुल्क नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून भरता येते. आपली संपूर्ण माहिती भरा. संपूर्ण नाव, व्यवसाय, पत्ता, नोकरी, व्यवसाय आदी इंत्यभूत माहिती देणे अनिवार्य असते.

कुटुंबाची आणि वारसदारांची संपूर्ण माहिती येथे भरावी लागते. आपल्या मालमत्तेचे विवरणही करावे लागते. मालमत्ता, संपत्ती कोणाच्या नावाने करायची आहे, त्याचे संपूर्ण नाव, नाते याचे विवरण भरावे लागते.

त्यानंतर इ-विल जनरेट करावे लागते. एखाद्या वकिलाने तयार केेल्याप्रमाणे विलचामसुदा स्क्रिनवर येतो.

मसुद्याचे काळजीपूर्वक वाचन करावे. काही दुरुस्ती असल्यास कच्च्या मसुद्यात करावी. काही अतिरिक्त माहिती भरायची झाल्यास तसा उल्लेख करावा.

अंतिम इच्छापत्र तयार झाल्यास मेलवर त्याची प्रत येते. काही दिवसांपूर्वी पोस्टाने हार्डकॉपी मिळते.

ई-विलवर दोन साक्षीदारांसमोर सह्या कराव्यात. वयाचे 18 वर्षे पूर्ण करणार्‍यालाच ई-विल तयार करण्याचा अधिकार आहे किंवा पात्र आहे.

इ-विलमध्ये अचूक माहिती भरा. अर्धवट किंवा अस्पष्ट माहितीने गोंधळ उडू शकतो. संपूर्णपणे विचारपूर्वक सल्लामसलत करून ई-विल भरण्याचा निर्णय घ्या. किमान दोनव्यक्तींच्या समोर ई-विलची प्रक्रिया पूर्ण करावी.

ई-विलमध्ये चल-अचल संपत्तीचा समावेश करा. बँकेच्या मुदत ठेवी, लॉकर्स, प्रॉपर्टी,बाँड, विमा आदींची अधिकृतपणे माहिती भरा.

आवश्यक कागदपत्रांचे क्रमांकाचा उल्लेखकरणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*