Type to search

जळगाव

ई-तिकीट काढतांनाएटीएमची माहिती भरल्यानंतर खात्यातून 34 हजार लांबविले

Share

जळगाव । ऑनलाईन तिकीट काढतांना एटीएमची माहिती भरल्यानंतर ओटीपी विचारून महिलेच्या खात्यातून 34 हजार रुपये एका भामट्याने परस्पर काढल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. महिलेने तात्काळ एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला धाव घेवून घटनेची माहिती दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी या महिलेला सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुपारी उशिरा महिलेने सायबर पोलिसात तक्रार दिली.

पुणे येथे जाण्यासाठी मेहरुण रामेश्वर कॉलनीत राहणार्‍या महिलेने गुगलवरुन संगितम ट्रॅव्हल्स्चा नंबर मिळविला. या नंबरवर संपर्क केल्यानंतर संबंधिताने महिलेच्या मोबाईलवर लिंक शेअर करून आपली माहिती भरण्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने त्याला विचारणा केल्यानंतर त्याने सुरुवातीला आपल्या खात्यातून 100 रुपये घेण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर उर्वरित भाड्याचे पैसे ट्रॅव्हल्स्मध्ये बसल्यावर दयावे लागतील, असे सांगितले होते. त्यानंतर महिलेने संबंधित इसमाने पाठविलेल्या लिंकवर माहिती भरल्यानंतर एटीएम कार्डवरील डिटेल माहिती देखील भरली.

त्यानंतर संबंधिताने मोबाईलवरून ओटीपी विचारला होता. महिलेने ओटीपी सांगितल्यानंतर संबंधिताने लवकरच तिकीट बुकींग होवून आपल्याला संदेश येईल, असे सांगितले होते. काही वेळानंतर महिलेच्या पतीने तिला फोन करून खात्यातून 34 हजार रुपये का काढले याबाबत विचारणा केल्यानंतर महिलेने पैसे काढले नसल्याचे सांगितले. दरम्यान तिकीट काढणार्‍याला ओटीपी दिल्यानंतर खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!