इस्रोने केले ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण

0

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून इस्रोने पीएसएलव्ही-सी३८ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

या माध्यमातून इस्रोने कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

पृथ्वीवरील घडामोडींकडे लक्ष ठेवण्यात कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहासोबतच आणखी ३० उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

या उपग्रहांचे वजन ३० किलो इतके आहे. एकाचवेळी ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

*