इव्हीएम स्कॅन्डल की पराभूत मानसिकतेचा घोटाळा?

0

इंटरनेटच्या मायाजालातील सोशल मिडीयाला वेसणं घालणं अलीकडे कठीण झालय. त्यातल्या त्यात ‘व्हॉटस ऍप’ नावाच भूत तर आमच्या मानगुटीवर असं काही बसलं की आमची मान वर व्हायची संधी विरळच! ताठ मानेनं जगणं, हातातील भ्र्रमणध्वनीने केव्हाच हिरावून घेतलं आहे. गेल्या आठवडा भरात इ.व्ही.एम. स्कॅन्डल घडल्याच्या अनेक पोस्टस, व्हीडीओ क्लिप आणि ङ्गोटो व्हायरल झाल्यात. या सर्वांचा संशय ई.व्ही.एम. नावाच्या मुक्या यंत्रावर होता.

लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतातील आत्मा म्हणजे निवडणूक प्रक्रिया, ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अधिपत्त्याखाली राबविली जाते. निवडणूक आयोग हि एक स्वायत्त यंत्रणा आहे. ती  कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला किंवा आश्‍वासनाला बळी पडणे लोकशाहीत तरी जरा कठीणच आहे. एकंदरीत पारदर्शीपणा निवडणूक आयोगाचे सूत्र असते. अशी वस्तुस्थिती असताना आठवडाभरापासून यासंदर्भातील पोस्टस व्हॉटसअप वरुन ङ्गिरत असल्याने सामान्य मतदारांच्या मनातही संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे.

का निर्माण झाला संशय

मुंबई महापालिकेतील मुलुंडमधील सहा पैकी सहा सीट भाजपाच्या ताब्यात… अशी पोस्ट मतमोजणीनंतर दीड तासातच व्हायरल झाली आणि निकाल घोषणेनंतर ही पोस्ट खरी असल्याचेही उघड झाले. या ठिकाणी अवघ्या दीड तासात म्हणजे साडेअकरालाच भाजपाला विजयी झाल्याचा साक्षात्कार कसा घडला,

येथे संशयी पाल चुकचुकली दुसरे म्हणजे पुण्यात ज्या ठिकाणी सी.एम.ची सभा गर्दी नसल्याने रद्द झाली. त्या ठिकाणी ६२ जागा भाजपाला कशा मिळाल्या? तिसरे म्हणजे नाशिक महापालिकेत मनसेची पाच वर्षे सत्ता होती, या ठिकाणी मोठी विकासात्मक कामे झाल्याचा दावा केला गेला, तरीही बोटावर मोजण्याइतक्या सीट मनसेला कशा मिळाल्या? चौथे म्हणजे नोटबंदी, शेतमालास भाव नाही, काळा पैसा आणण्याचे ङ्गोल आश्‍वासन आणि ‘अच्छे दिनचे गाजर…. ’ या सगळ्यात पिचलेला मतदार भाजपाच्या मंाडीवर जाऊन बसला तरी कसा?…. यासह आणखीही अनेक कारणे असताना राज्यात भाजपाला अतुलनीय यश संपादन करता आले आणि येथेच माशी शिंकली?

व्हायरल पोस्टही संशयीत

वरील सर्व कारणांशिवाय सोशल मिडीयावर ङ्गिरणार्‍या अनेक पोस्टमुळेही ईव्हीएम स्कॅन्डल घडल्याचा संशय निर्माण झाला. एका व्हिडीओ क्लिपमध्ये कॉम्प्युटर ग्राङ्गीक्सद्वारा घोटाळा कसा होऊ शकतो, हे दखविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र संबंधित तंत्रज्ञ या ग्राङ्गीक्सशी सहमत नाहीत.

purushtom guddam logo cahvdi

म्हणून संशय पेरण्यापलीकडे त्या विडीओ क्लिप्सचा ङ्गारसा वापर झाला नाही. दुसरे म्हणजे नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक ०३ मध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याची पोस्टही व्हायरल झाली. यामध्ये काही उमेदवारांना शून्य मते प्राप्त झाल्याचा तपशील देण्यात आला. मात्र काही जागरुक नागरिकांनी ही पोस्ट राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांना पाठविल्यानंतर त्यांनी प्रभाग तीनमधील निकाल पत्रकाची ङ्गोटोकॉपीच व्हॉटसअप व्हायरल केली.

त्यात संबंधीत उमेदवारांना यथातथा मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. कुणालाही शून्य मतदान झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे ईव्हीएम घोटाळा झालाय हे सांगणार्‍या पोस्टसुध्दा  सत्यावर आधारित नसल्याचे दिसून आले.

अब की बार… हमारा वार….

या निवडणुकांमध्ये भाजपाला अङ्गाट यश मिळाले. हा प्रकार विरोधकांना पचला नाही. पण जरा मागे वळून आपण इतिहास लक्षात घेतला तर ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीची प्रचीती आल्याशिवाय राहात नाही. आता देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे या निरवडणुकात वापरण्यात आलेल्या ९० हजार एव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी केला.

मतदानापूर्वी हे यंत्र खाजगी कंपनीकडे देखभाल व दुरुस्तीसाठी जातात. त्यामुळे या यंत्रांमध्ये जांगळगुत्ता झाल्याचे आरोप करण्यात आले. पण खरंच अस होऊ शकते काय….? या प्रश्‍नावर चिंतन केले पाहिजे! आपण असे गृहित धरु या की ईव्हीएम मशिनमध्ये गडबड करुन एका विशिष्ट उमेदवाराला अधिकाधिक मतदार होण्यासाठी ‘सेटिंग’ करण्यात आली. समजा अशी सेटींग करुन मशिन मतदान केंद्रावर आणली गेली.

सकाळी सात वाजता ही मशीन मतदानासाठी वापरण्याआधी ‘मॉक पोल’ नावाची प्रक्रिया पार पाडावी लागते, ही प्रक्रिया काय असते. ते जरा समजून घेवूया… मतदान केंद्राध्यक्ष प्रत्यक्ष मदान प्रक्रिया सुरु करण्याआधी सर्व उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधींना ईव्हीएम मशिनजवळ बोलावतो. मशिनचे सील दाखवितो. (जर संशय आला, तर उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणीच आक्षेप घेऊन तक्रार करु शकतात)

त्यानंतर वॅलेट मशिनवरील सर्व उमेदवारांना उमेदवार प्रतिनिधीसमोर एक-एक मतदान करविले जाते… ही एक नमुना प्रक्रिया असते. जर का ईव्हीएम मशिनमध्ये विशिष्ट उमेदवारास अधिक मतदान देण्यासाठी सेटिंग केली असेल, तर याच वेळी त्या उमेदवाराला जास्त मतदान होत असल्याचे निदर्शनास येईल. आणि इतर उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी आक्षेप घेऊ शकतील. थोडक्यात अनेक डोळे आणि मेंदू या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहात असल्याने, ईव्हीएममध्ये अशी काही गडबडी करता येणे शक्य वाटत नाही.

२००९ला भाजपाचाही हाच सूर

आता भाजपाचे काही नेते ईव्हीएममध्ये गडबडी होऊच शकत नाही, असे छाती ठोकून सांगत असले तरी याच भाजपावाल्यांनी सन २००९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सत्तेचा दुरुपयोग करुन कॉंग्रेसवाल्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता.

भाजपाचे तत्कालीन पराभूत उमेदवार किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मॅनेज केल्याचा आरोप केला होता. व तसे सिध्द करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी संजय निरुपम यांनीच सोमय्या यांचा मुद्दा खोडून काढला होता आणि ईव्हीएम टोटल सेङ्ग आणि पारदर्शी असल्याचा दाखला दिला होता. म्हणजेच हरणारा मग तो कोणीही असो, खापर विरोधकांच्या डोक्यावर ङ्गोडण्यातच त्यांना धन्यता असते. हे सिध्द झाले.

जाता-जाता ईव्हीएमविषयी….

ईव्हीएम मशीन प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र असते. ते संगणक प्रणालीसारखे इंटरनेटला जोडता येत नाही. त्यामुळे त्यात सामुहिक पध्दतीने छेडछाड करता येणे अशक्य असते. समजा मशिन बनविणार्‍या किंवा देखभाल दुरुस्ती करणार्‍या कंपनीत छेडछाड झाली असा संशय असलाच तर एक गोष्ट लक्षात घ्या.

सर्व मशिनची रसमिसळ केले जाते. त्यामुळे कोणती मशिन कोणत्या ठिकाणी जाईल. हे कुणालाही सांगता येत नाही. ईव्हीएम मशिन ‘भारत इलेक्ट्रॉनिक लि…’ ही कंपनी बनविते.

न्यायालयाच्या एका निकालातील निर्देशानुसार पुढील सन २०१९मध्ये लोकसभा निवडणुका व्हीव्हीपीएटी या पध्दतीने होणार आहेत. व्हीव्हीपीएटी म्हणजे मतदाराने मतदान केल्यानंतर त्याला एक चिठ्ठी प्रिंट करुन दिली जाईल व त्यात त्याने कुणाला मतदान केले हे स्पष्ट होईल….

एवढी सारी पारदर्शकता असताना निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे बिनबुडाचे आहे. याशिवाय कुठेही संशय निर्माण झाला तर निवडणूक निर्णय अधिकारी किंवा संबंधित आएएस आणि आपीएस आणि इतर श्रेणीतील महत्त्वाच्या पदांवरील अधिकार्‍यांकडे आपणास तात्काळ तक्रार करता येऊ शकते….. म्हणूनच व्हॉटसअपवरील व्हायरल पोस्टची सत्यासत्यता तपासून बघावी आणि मगच मत पक्के करावे. हा सारा लेखनप्रपंच केल्यानंतर ईव्हीएम स्कँडल आहे की, पराभूत मानसिकतेचा घोटाळा! हे सुज्ञास सांगणे न लगे…

माणूस…. मग तो कुणीही असो, तो आपल्या पराभवाचे खापर दुसर्‍याच्या डोक्यावर  ङ्गोडण्यात त्याला धन्यता असते. अस म्हणतात, जगात सारं काही सापडू शकते, पण आपली चूक शोधूनही सापडत नाही… हे भगवान, या अल्लाह… ये तूने क्या किया, मेरेही साथ एैसा क्यू किया…?

असा उद्विग्न सवाल करणार नाही तो हरलेला माणूस कसला? गेल्या आठवड्यात जि. प., पं. स. आणि महापालिकांचे निकाल लागल्यानंतर  ‘जिते हुए सिकंदर तो मजे मे… लेकीन हारे हुऐ बादशाह बाजीगर बनने के ङ्गिराके में लग गय!’ अनेक पराभूतांनी मतदान प्रक्रियेतील ई.व्ही.एम. (इलेक्ट्रॉनिवक व्होटींग मशीन) वर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले… खरच, इ.व्ही.एम. स्कॅन्डल घडलं की, पराभूत मानसिकतेचा हा घोटाळा आहे, याच जांगळगुत्त्यावर आजची चावडी…!

मो. ९५४५४६५४५५

LEAVE A REPLY

*