इराकमधील बगदादमध्ये बॉम्बस्फोट

0

इराकची राजधानी बगदादमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे.

या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाल्याची माहिती समजते आहे.

एका कारमध्ये हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला.

या हल्ल्यात बगदादमधील एका प्रसिद्ध आईस्क्रिम दुकानाला टार्गेट करण्यात आलं होतं. काल (सोमवार) रात्री उशिरा हा स्फोट झाला.

सध्या रमजानचा महिना सुरु असल्यानं संध्याकाळनंतर बाजारपेठेत बरीच गर्दी होते. त्यामुळे याचवेळी हा स्फोट करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*