इमॅन्युएल मॅक्रोन यांना ठोस निर्णयांसाठी संसदीय निवडणुक जिंकण्याची गरज

0
फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रोन केवळ ५ वर्षांपूर्वी राजकारणात आले आहेत. समाजवादी सरकारमध्ये अर्थमंत्रिपद सांभाळले.
भ्रष्टाचार, बेरोजगारी, खालावलेली अर्थव्यवस्था ही कारणे देत राजीनामा दिला. एक वर्षापूर्वी ‘आं मार्शे’ म्हणजे ‘पुढे चला’ (आगे बढो) चळवळ सुरू केली.
आता राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. फ्रान्सच्या राजकारणातील ही सर्वात अल्पावधीत झालेली प्रगती आहे.
१९५८ नंतर फ्रान्सच्या आधुनिक प्रजासत्ताकामध्ये प्रथमच ३९ वर्षीय व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी आली आहे.
१४ मेपासून मॅक्रोन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
फ्रान्सवर: मंदीचा बळी ठरलेल्या देशात दिसेल आर्थिक बदल

ईयू: मॅक्रोन यांच्या विजयामुळे युरोपीय संघाचे विघटन टळले
ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर फ्रान्स व जर्मनीच या संघटनेचे इंजिन आहे. मॅक्रोन ईयूचे समर्थक आहेत. ली पेन मात्र देशाने इयुमधून बाहेर पडावे, या मताच्या होत्या.

भारत: संरक्षण सौद्यांना वेग येईल, विद्यार्थ्यांसाठी दारे खुली राहतील
भारत-फ्रान्सच्या संरक्षण सौद्यांत वेग येईल. मॅक्रोन युरोपीय संघाचे समर्थक नेते आहेत. ही बाब भारतासाठी पूरक ठरेल. अमेरिका व ऑस्ट्रेलियात व्हिसा नियमांत झालेल्या बदलामुळे भारतीय कामगार व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. फ्रान्स मात्र भारताच्या कुशल कामगार व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.

LEAVE A REPLY

*