इमॅन्युअल माक्रोन फ्रान्सचे नवे राष्ट्रपती; भारतातूनही मतदान

0
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या उमेदवार मरीन ली पेन यांना नकारत फ्रान्सच्या जनतेने इमॅन्युएल मॅक्रोन यांना आपले नवे राष्ट्राध्यक्ष निवडले आहे.
39 वर्षीय मॅक्रोन फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
मतपत्रिकांच्या माध्यमातून झालेल्या या मतदानात मॅक्रोन यांना तब्बल ६५.५ टक्के मते मिळाली आहेत. युरोपातील जर्मनीनंतरची दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या फ्रान्समध्ये मॅक्रोन विजयी व्हावेत, अशी युरोपातील बहुतांश लोकांची इच्छा होती.
भारतातूनही मतदान
पुद्दुचेरीतून मतदान – फ्रान्सच्या वसाहती ज्या भागात होत्या, त्या ठिकाणीही मतदान झाले. यात भारताच्या पुद्दुचेरीचा समावेश होता. येथे ४६०० मतदार होते. कराईकल, चेन्नईमध्येही मतदानकेंद्र उभारण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*