इमॅजिकामध्ये पर्यटक आणि सुरक्षा रक्षकात हाणामारी

0

रायगडमधील अॅडलॅब इमॅजिका अम्युझमेंट पार्कमध्ये पर्यटक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त समोर येतं आहे. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार असल्यानं इमॅजिकामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते.

रात्री आठच्या दरम्यान, या सर्व पर्यटकांना बाहेर येण्यास सांगितलं गेलं. पर्यटक जास्त असल्यानं बरीच गर्दी या ठिकाणी होती. त्यामुळे एका रांगेत सर्वांना बाहेर सोडण्यात येत होतं.

यावेळी काही महिला पर्यटक दुसऱ्या रांगेत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या.

त्यावेळी येथील एका सुरक्षा रक्षकानं त्यांना अडवलं. यावरुनच त्यांच्यात वाद झाला. यावेळी महिला पर्यटकांसोबत असणाऱ्या पुरुष पर्यटकांसोबत बराच वाद झाला. शेवटी याच वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं.

याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

*