इमारतींच्या तळमजल्यात अनधिकृत वापर : ३६६ मिळकतधारकांना नोटीस

0

जळगाव |  प्रतिनिधी :  इमारतींच्या तळमजल्यात पार्किंगच्या जागी अनधिकृतपणे व्यवसायिक वापर होत असल्याच्या तक्रारीवरुन महानगरपालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील ४६५ इमारतींपैकी ३६६ इमारतींमध्ये अनधिकृत वापर सुरु असल्याचे निर्देशनास आले. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून दि.१ एप्रिलपासून कारवाई करण्याचा इशारा आयुक्त जीवन सोनवणे यांनी केला आहे.

Jivan Sonawane

इमारतींच्या तळमजल्यावर पार्किंगच्या वापर करणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील बहुतांश इमारतींतील तळमजल्यात अनधिकृतपणे बांधकाम करुन व्यवसायिक वापर सुरु असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

त्या अनुषंगाने आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगररचना विभागाला सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरातील ४६५ इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले.

यातील ९९ इमारतींमध्ये योग्य वापर असल्याचे तर ३६६ इमारतींमध्ये अनधिकृत वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ३६६ मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

दुप्पट दंडात्मक आकारणी

शहरातील ३६६ मिळकतधारकांकडून अनधिकृतपणे वापर सुरु असल्यामुळे प्रभागनिहाय घरपट्टीची दुप्पट दंडात्मक आकारणी केली जाणार आहे.

कारवाई अटळ

तळमजल्यात अनधिकृत वापर असल्यामुळे संबंधित मिळकतधारकांवर दि.१ एप्रिलपासून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*