इमामपुरात रास्ता रोको

0

मोकाटे खून प्रकरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील रावसाहेब मोकाटे याच्या खुनाचा तपास करण्यात यावा, जेऊर पोलीस चौकी सुरू करावी, रास्तालुट, अवैध धंदे बंद करावेत यासह विविध मागण्यांसाठी आज सकाळी नगर औरंगाबाद रोडवरील इमामपूर येथे रास्तारोको करण्यात आला. पोलीस अधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर आंदोनल मागे घेण्यात आले आहे.
पांढरी पुलाच्या जवळ हॉटेलच्या शेजारी रावसाहेब मोकाटे या तरूणाचा खुन करण्यात आला होता. एक महिना उलटला तरी या खुनाचा तपास लागला नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. मंगळवारी (दि.6) सकाळी इमापुर, पांढरीपुल, जेऊर, एमआयडीसी, शेंडी अशा विविध ठिकाणच्या नागरिकांनी या खुनाचा तपास लावण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला आहे. तसेच याच परिसरात रास्तालुटीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, तालुक्यात पोलीस गस्त वाढविणे, अवैध धंद्यांना आळा घालणे

अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. यावेळी पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांनी नागरिकांना खुनाचा तपास करुन अन्य मागण्या पुर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खुनाच्या गुन्ह्यातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती आले असून लवकरच यातील दोन आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहीती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*