Type to search

ब्लॉग

इन्व्हेस्टिगेटिव्ह सायकॉलॉजी

Share

प्रत्येक गुन्हेगार गुन्ह्याचा काही ना काही पुरावा मागे सोडून जातो. पण ते पुरावे नेहमीच डोळ्याला दिसतील असे नाही. न्याय सहाय्यक शास्त्र किंवा ऋेीशपीळल डलळशपलश हे अदृश्य पुरावे शोधायला आपल्याला मदत करतात. डोळ्यासमोर पण अदृश्य असलेल्या पुराव्यांना नजरेत आणायला काय केले जाते, ते या सदरातून आपण जाणून घेऊ.

क्राइम सीन म्हणजे घटना स्थळ हे पुराव्याने भरलेले असते. काही अनपेक्षित व अनाकलनीय घटना अशा घडतात की, त्यांचा काहीच सुगावा लागत नाही. घटनेला कोणीही साक्षीदार नाही, गुन्हा कोणी केला असेल, याचा जेव्हा काहीही अंदाज येत नाही किंवा कोणीही संशयित डोळ्यासमोर येत नाही तेव्हा ळर्पींशीींळसरींर्ळींश िीूलहेश्रेसू चा उपयोग होतो.

खर्पींशीींळसरींर्ळींश िीूलहेश्रेसू म्हणजे गुन्हे अन्वेषणाला सहाय्यक मानसशास्त्रीय अभ्यास असे आपण म्हणू शकतो. गुन्हेगाराच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव समजणे शक्य असते.

साक्षीदाराने गुन्हेगाराच्या केलेल्या वर्णनाप्रमाणे आर्टिस्ट संशयिताचे चित्रे काढतो आणि ओळख पटते. पण जेव्हा साक्षीदार नाही तेव्हा क्राइम सीन बघून संशयितांची व्यक्तिरेखा उभारण्याचेे काम मानसशास्त्रज्ञ करू शकतात.

खुनाच्या प्रकरणात घटनास्थळी बॉडी जर जशीच्या तशी टाकून गुन्हेगार निघून गेला असेल, घटना स्थळी उपलब्ध वस्तूनेच जर वार/खून केला असेल, झटापट झाल्याचे पुरावे दिसत असतील तर, कदाचित रागाच्या भरात आवेशात खून झाला असेल, तर अशी व्यक्ती क्षणार्धात समतोल सोडून खून करून नंतर भानावर आली असावी. संशयित हा शीघ्रकोपी व खूप भावूक व्यक्ती असू शकतो.

मात्र, खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, रक्ताचे डाग पुसले असतील, पाउलखुणा पुसल्या असतील, हत्यारांची विल्हेवाट लावली असेल, बोटांचे ठसे पुसले असतील तर त्या व्यक्तीने गुन्हा थंड डोक्याने केलेला आहे. अशी व्यक्ती रोजच्या जीवनात नीटनेटकी व नियोजितपणे वागणारी असू शकते.

मृतदेहावर एकाच ठिकाणी अनेक वार केले असतील किंवा अनेक ठिकाणी वार केले असतील तर गुन्हेगाराचे व्यक्तिमत्त्व व भावना वेगवेगळ्या असतात.

इरलज्ञर्सीेीपव लशहर्रींर्ळेीी म्हणजे गुन्ह्या पूर्वीचे वागणे म्हणजे उदाहरण म्हणून, दबा धरून बसणे, गुन्ह्यासाठी वातावरण अनुकूल करून ठेवणे, हत्यारांची तयारी असणे, इत्यादी व झेीीं-ेषषशपलश लशहर्रींर्ळेीी गुन्ह्यानंतरचे वागणे म्हणजे उदाहरण म्हणून पुराव्यांची विल्हेवाट लावणे, तपास करणार्‍यांची दिशाभूल करण्यासाठी काहीतरी करणे, खून हा आत्महत्या असल्याचे भासवणे, या सगळ्या गोष्टी गुन्हेगाराचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव समजण्यास उपयुक्त ठरतात.

मानसशास्त्रात व गुन्हे अन्वेषणामध्ये खर्पींशीींळसरींर्ळींश िीूलहेश्रेसू हा अत्यंत नवीन प्रयोग आहे. प्रगत देशांत याला खूप वाव आहे. वेगळे करियर म्हणून हा विषय अत्यंत आव्हानात्मक व रोमांचक आहे.
– परेश चिटणीस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!