इन्फोसिसचे शेअर्स विकण्याबाबतचे वृत्त खोटे : नारायण मूर्ती

0
इन्फोसिसच्या प्रतिष्ठित सह संस्थापकांनी २८ हजार कोटी रुपये किंमतीचे सर्व १२.७५ टक्के शेअर विकण्याची तयारी सुरू केली आहे.
तीन वर्षापूर्वी प्रमोटर्सने इन्फोसिस सोडल्यानंतर कंपनी चालविण्याच्या नियमांमध्ये बदल झाले म्हणूनचं सह-संस्थापक वर्गात जास्त निराशा आहे, असं बोललं जातं आहे.
इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का आणि सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्यात सुरू असलेल्या वादाचा इन्फोसिसला फटका बसणार आहे, असं बोललं जातं आहे.
इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबूलाल आणि के. दिनेश यांच्याकडे इन्सफोसिसची कोणतीही कार्यकारी किंवा गैर कार्यकारी जबाबदारी नाही.
शेअर विकणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचं नारायण मूर्ती यांनी सांगितलं आहे.
शेअऱ विकणार असल्याची माहिती खरी नाही. इन्फोसिसच्या ३.४४ टक्क्यांसह आपला परिवार प्रमोटर ग्रुपमध्ये सर्वात मोठा शेअर होल्डर ग्रुप आहे. त्यामुळे हे वृत्त निराधार आहे. तर दुसरीकडे  इन्फोसिस सोडण्याआधी कंपनीचा व्यवहार पाहणारे नंदन निलेकणी यांनी इन्फोसिसवर बोलायला नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

*