इनोव्हेशन सेल चेअरमनपदी डॉ.पाटील

0
धुळे / युरोलॉजी सोसायटीच्या नवीन सेलवर डॉ.आशिष पाटील यांची चेअरमनपदी नियुक्ती केली असून पुढील पाच वर्षापर्यंत या संघटनेचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी डॉ.आशिष पाटील यांच्यावर राहणार आहे.
डॉ.आशिष पाटील यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट 32 संशोधन, 8 सिमुलेटर संच बाजारात उपलब्धी व 150 शोधनिबंधांचे प्रकाशनकार्य व सिमुलेशन लॅबचा सर्वोच्च दर्जा तसेच युरोलॉजीच्या क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा एस.एस.बापट पुरस्कार सलग तीन वर्षापासून मिळविण्याची परंपरा राखली असून या निकषांमुळे त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

संघटना पुढील उद्दीष्ठांवर काम करणार आहे. संशोधनाची आवड व प्रतिमा अणारे तज्ञ युरोलॉजिस्टस् संघटन करणे., कल्पकतेचा विकास करणारे दालन निर्माण करून सारख्याच विचारधारा असलेल्यांसाठी एकच व्यासपीठ उभारणे, सारखे विचारधारा असणारे संशोधकांना एकत्र करून मजबूत तंत्रज्ञान निर्मिती संघाची स्थापना करणे, एकत्रितपणे विचार करून उत्तम तंत्रज्ञानाच्या निर्मितीस पुढाकार घेणे.

संशोधकांना व संबंधीत व्यक्तींना त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी नाव, शैक्षणिक व्यासपीठासाठी व्यावसायीक व अव्यावसायिक श्रृंखलेद्वारे आर्थिक निधी उपलब्धतेवर भर देणे, डॉक्टरांनी संशोधनाने निर्माण केलेल्या यंत्रांसाठी खरेदीस इच्छूक असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या व डॉक्टर्सना संलग्नित करणे आदी कामे यात करण्यात येतात.

किडनीतज्ज्ञांना विचारांची देवाण-घेवाण करता येईल असा हेतू ठेवून डॉ.आशिष पाटील यांनी युरोलॉजिकल सोसायटीपुढे प्रस्ताव ठेवला होता. युरोलॉजिकल सोसायटीने त्यास मान्यता देवून वरील सेलची राष्ट्रीय स्तरावर स्थापना केली आहे.

तेजनक्ष इनोव्हेशन फौंडेशनचे किडनीतज्ज्ञांसाठी आपापल्या नेहमीच्या रुग्ण उपचारादरम्यान येणारी अडचण व त्यावर असणारी उपाययोजना यांचा अभ्यास करून त्यावर योग्य उपायही शोधलेले आहेत.

तसेच वैद्यकीय व्यवसाय करतांना संशोधनात्मक तंत्रज्ञानाची मुळे मजबुत करण्यासाठी उपाय शोधण्याची महत्वाची कामगिरी केलेली आहे.

LEAVE A REPLY

*