इगतपुरीतील भावली भागाला विकसित करणार; पर्यटनमंंत्री जयकुमार रावल

0
इगतपुरी । महाराष्ट्रातील अमाप निसर्गसौंदर्य असणार्‍या भावली परिसरात लवासाच्या धर्तीवर पर्यटन विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चाची तरतुद करण्यात येणार आहे.देशभरात पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणार्‍या इगतपुरी तालुक्याला तीन महिन्यात नंदनवन करू अशी माहिती राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

इगतपुरी तालुक्यातील पर्यटन उद्योगासाठी विकसित करण्यात येणार्‍या भागाचा पर्यटनमंत्र्यांनी स्वतः दौरा करून माहिती घेतली. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, पी. एम. कुलकर्णी, एस. बी. पाटील यांच्यासमवेत भावली धरण भागातील पर्यटकीय दृष्टीने दीर्घ पाहणी केली.

यावेळी रावल म्हणाले की इगतपुरी तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.इगतपुरी तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्याला नवी ओळख निर्माण करण्यासाठी नेहमीच कार्यरत आहेत.

यातील संजय खातळे, विनायक पाटील, प्रशांत कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शरीफ शेख, पोपट भागडे, जगन कदम, नंदू कडू, गोरख भागडे, दत्ता भागडे, नामदेव भागडे, योगेश भागडे, दशरथ भागडे, सचिन खातळे, विक्रम जगताप, दिलीप हाडप, फुलचंद वीर, भालचंद्र भागडे, बारकू म्हसने, गोरख कडाळी, वसंत भागडे, विनोद साळुंखे, रवींद्र परदेशी, धीरज वाळुंज आदी युवकांनी भावली धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रस्ताव सादर केले.

गेल्या दोन वर्षांपासून या युवकांनी सातत्याने प्रयत्नशील राहून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केला.पर्यटनमंत्र्यांनी प्रस्तावाची माहिती घेऊन त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार धबधबे, मनोरंजन पार्क, पार्क वे, रोप वे, जॉगिंग ट्रॅक, खेळण्याचे मैदान, स्ट्रीट लाईट, वृक्षारोपण आदी कामे करण्यात येऊन भावली परिसराला नयनरम्य करण्यात येईल. यासाठी पर्यटन मंत्रालय जवळपास 50 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

नयनरम्य भावली परिसर : भावली धरण भागात पर्यटनासाठी विपुल संधी आहे. अतिपाऊस, डोंगर दर्‍या, धबधबे, घाट, वृक्षराजी आदी पर्यटनसाठीच्या विविध बाबींनी वर्षभर या भागात पर्यटक येत असतात. तथापि कुठल्याही सुविधा नसल्याने पर्यटक नाराज असतात. भावली परिसर मुंबईपासून अवघ्या 90 किमी तर नाशिकपासून 45 किमी आहे. पर्यटन विभागाच्या योजनेनुसार हा परिसर विकसित करण्यात येणार असल्याने इगतपुरी तालुक्याला विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रयत्नांची फलनिष्पती : इगतपुरी तालुक्याला नंदनवन करून तालुक्याला नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी पर्यटन विभागाकडे सातत्याने प्रयत्न केले.त्यानुसार फलनिष्पत्ती म्हणून पर्यटन खात्याने आमच्या प्रस्तावावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्याने इगतपुरी तालुका देशाच्या नकाशावर येईल.
प्रशांत कडू

15 दिवसांत कृतीआराखडा तयार : भावली परिसरासह संपूर्ण इगतपुरी तालुक्यात पर्यटन उद्योगाला भरभराटी देणार्‍या संधी आहेत. प्रस्तावानुसार भावली भागासाठी आगामी 15 दिवसांत कृती आराखडा तयार करण्यात येईल.3 महिन्यातच कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे नियोजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येईल.
आशुतोष राठोड, सहव्यवस्थापकीय संचालक पर्यटन महामंडळ नाशिक

LEAVE A REPLY

*