इगतपुरीतील बॅचलर पार्टी दरम्यान वापरलेली महागडी कार नाशिकमधून जप्त

0

इगतपुरी : शहरातील तळेगाव शिवारात मुंबई आग्रा महामार्गावरील मिस्टिक व्हॅली या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या बॅचलर पार्टीत बार बालांसोबत नाचणाऱ्या तरुणांनी या गुन्ह्यात वापरलेली सुमारे दहा लाख रुपयांची हुंडाई वरना कार आज इगतपुरी पोलिसांनी नाशिक येथून जप्त केली.

संशयितांनी या पार्टीत बेकायदेशीररित्या दारू बाळगल्याप्रकरणी एक नवीन वाढीव कलम लावण्यात आला आहे. या बॅचलर पार्टीत ६ बारबालांसह इतर ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या संशयितांमधील पृथ्वीराज पवार रा. नाशिक या तरुणाने वापरलेली लाल रंगाची हुंडाई वरना क्रमांक एमएच १५ एफएन  ५००१  ही कार नाशिक येथून पोलिसांनी जप्त केलीआहे. ही चारचाकी अरुण घुले रा. गिरणारे, नासिक याच्या नावावर असून या गाडी मालकाची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, या तरुणांनी अवैधरीत्या पार्टीत दारू बाळगल्या प्रकरणी वाढीव कलम ६५ ख ,ड असे लावण्यात आले आहेत. या पार्टीसाठी वापरण्यात आलेला बंगला हा भांडुप येथील एका माजी आमदाराचा असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*