इकरा संघ विजयी ; गोदावरी महाविद्यालय उपविजयी

0
जळगाव । गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंर्तगत जळगांव विभागीय आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत इकरा संघ विजयी तर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय उपविजयी ठरले.

या स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी
महाविद्यालयाचे मैदानावर झाल्या. या स्पर्धेमध्ये 4 महाविद्यालयाच्या संघानी सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी आय.एम.आर.चे डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जी. अराजपुरे,उपप्राचार्य प्रा. प्रविण फालक, क्रीड़ा संचालक, डॉ. पी.आर. चौधरी, प्रा. किरण नेहते, क्रीडा संचालक प्रा.आसिफ खान, प्रा. अखतर खान, प्रा.एम.एन. सोनवणे,प्रा.संजय जाधव,प्रा.चांद खान,प्रा.चंद्रकांत डोंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

अंतिम सामना इकरा महाविद्यालय विरूध्द गोदावरी महाविद्यालय यांच्यात झाला. या सामन्यात इकरा महाविद्यालयाच्या संघाने 2-0 गोल ने गोदावरी संघाला पराभूत करून विजयते पद पटकावले.विजयी व उपविजयी संघाला ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा.आसिफ खान , अकबर खान, असलमअली, याकुब शेख, यांनी पंच म्हणून कार्य केले व स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*