‘इंदू सरकार’ या सिनेमात सुप्रिया विनोद पुन्हा साकारणार ‘आयर्न लेडी’!

0

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बनणा-या ‘इंदू सरकार’ या सिनेमात सुप्रिया विनोद इंदिरा गांधी यांची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत.

वास्तववादी सिनेमा करण्यासाठी प्रसिद्ध असणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर इंदू सरकार हा सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेत्री सुप्रिया विनोद इंदिरा गांधीच्या भूमिकेत झळकणार आहे. इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणं अभिनेत्री सुप्रिया विनोद यांच्यासाठी नवी गोष्ट नाही.

याआधीही त्यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. 2014 साली दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या यशवंतराव चव्हाण यांच्या मराठी बायोपिक सिनेमात सुप्रिया विनोद यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.

यानंतर 2015 साली मराठी रंगभूमीवर आलेल्या ‘इंदिरा’ या मराठी नाटकातही सुप्रिया विनोद यांनी इंदिरा गांधी यांची प्रमुख भूमिका साकारली होती. आणीबाणी ते 1984 साली इंदिरा गांधींची हत्या या कालावधीतील घटनाक्रम या नाटकातून दाखवण्यात आला होता.

आता पुन्हा एकदा सुप्रिया विनोद या मधुर भांडारकर यांच्या सिनेमात इंदिरा ही भूमिका साकारत आहेत. या सिनेमात आणीबाणीपासूनचा इंदिरा गांधी यांचा प्रवास दाखवला जाणार आहे.

येत्या 28 जुलैला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.अभिनेत्री सुप्रिया विनोद यांच्यासोबतच अभिनेता नील नितीन मुकेश या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे.

नील नितीन मुकेश या सिनेमात संजय गांधी यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. याशिवाय अभिनेता अनुपम खेर आणि टोटा रॉय चौधरी यांचीही या सिनेमात भूमिका असणार आहे.

LEAVE A REPLY

*