इंदापूर तहसील : राज्यातील पहिले झिरो पेंडन्सी कार्यालय

0

पुणे / नागरिक तातडीच्या कामासाठी तहसील कार्यालयात आशेने येतात.

घरून निघतानाच काम होईल का नाही या धास्तीने कार्यालयात येण्यासाठी दूरवरुन प्रवास करतात.

त्यासाठी नागरिकांना अनेक अडचणीवर मात करत पैसे व वेळ दोन्ही खर्ची करावा लागतो. अशा परिस्थितीत नागरिकांचे कामे इंदापूर तहसील कार्यालयात लवकर होत असल्याचा सुखद धक्का नागरिकांना बसत आहे.

सरकारी काम म्हणजे बारा महिने थांब ही नागरिकांच्या मनात तहसील कार्यालयाच्या कामकाजाबाबत नकारात्मक प्रतिमा आहे.

हे बदलण्यासाठी पहिले सहा महिने या कर्मचार्‍यांना झिरो पेंडन्सी अ‍ॅन्ड डेली डिस्पोजल उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यालयातील प्रत्येक विभागाच्या खातेनिहाय टेबलवर नोंद वही करून रोजच्या कामाचा आढावा दुसर्‍या दिवशी सकाळी आढावा घेतला जातो.

त्यामुळे रोजचे कामे त्याच दिवशी र्पू्ण करण्याची सवय सर्व नायब तहसीलदार, कर्मचारी, शिपाई यांना झाली. नागरिकांचाही झिरो पेंडन्सी यशस्वी करण्यात सिहांचा वाटा असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकारी, कर्मचार्‍यांची कामकाजाबाबत सकारात्मक मानसिकता करण्यात आली.

यामुळेच इंदापूर झिरो पेंडन्सी अ‍ॅन्ड डेली डिस्पोजल उपक्रम यशस्वी झाल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*