Type to search

क्रीडा

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा उद्या अंतिम सामना; सिंधुची अंतिम ङ्गेरीत धडक

Share

जकार्ता | भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम ङ्गेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणा-या सिंधूने शनिवारी खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमावारीत तिस-या स्थानी असणा-या चीनच्या चेन यू ङ्गेई वर २१-१९, २१-१० ने मात केली. सिंधूने अवघ्या ४६ मिनिटातच सामना आपल्या नावावर करून अंतिम ङ्गेरी गाठली.

रियो ऑलंपिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला ङ्गेई विरुद्ध पहिल्या गेममध्ये संघर्ष करावा लागला. ङ्गेईने ३-१ अशी आघाडी घेत सामन्यात वर्चस्व निर्माण केले. मात्र, त्यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करत १०-१० अशी बरोबरी साधली. सामन्यातील ही लय सिंधू कायम करू शकली नाही आणि ती पुन्हा १५-१८ ने पिछाडीवर गेली. त्यानंतर सिंधूने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सलग तीन गुण मिळविले व १८-१८ अशी बरोबरी केली. या आक्रमकतेच्या जोरावर तिने पहिला गेम २१-१९ जिंकला.

सिंधूने डेन्मार्कच्या मिया बिलिचङ्गेल्टविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत सरशी साधत गुरुवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व ङ्गेरीत प्रवेश केला होता. पाचव्या मानांकित सिंधूने दुसजया ङ्गेरीच्या लढतीत एक तास दोन मिनिटामध्ये बिलिचङ्गेल्टविरुद्ध २१-१४, १७-२१, २१-११ ने सरशी साधली.

सिंधूचा जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या बिलिचङ्गेल्टविरुद्ध यंदाचा तिसरा विजय आहे. यापूर्वी तिने डेन्मार्कच्या या खेळाडूचा इंडियन ओपन व सिंगापूर ओपनमध्ये पराभव केला होता. सिंधूची यानंतरची लढत मलेशियाच्या सोनिया चेह व जपानच्या नाओमी ओकुहारा यांच्यादरम्यानच्या लढतीत विजेत्या खेळाडूसोबत होईल.

सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही आणि बिलिचङ्गेल्टने ६-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडूने पुनरागमन करताना बरोबरी साधली. सिंधूने कामगिरीत सातत्य राखत पहिला गेम जिंकला. दुसजया गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ अनुभवायला मिळाला. बिलिचङ्गेल्टने दमदार पुनरागमन केले. तिने सुरुवातीला ९-५ आणि त्यानंतर १०-७ ने आघाडी घेतली. सिंधूने त्यानंतर सलग ३ गुण वसूल करीत १०-१० अशी बरोबरी साधली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!