इंग्लंडने सामन्यासह मालिकाही जिंकली

0

साऊदम्प्टन । चौथ्या कसोटीत इंग्लंडने भारतावर मात केली असून, भारताच्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचा संघर्ष अखेर अयशस्वी ठरला आहे. इंग्लंडने साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीसह मालिकाही खिशात घातली आहे. इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 184 धावांत गुंडाळून साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीत 60 धावांनी विजय मिळविला. इंग्लंडने हा सामना जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.

चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला दुसर्‍या डावात 271 धावांवर रोखले. त्यामुळे भारताला विजयासाठी 245 धावांचे माफक आव्हान होते. मात्र, भारतीय फलंदाजानी आजही हराकरी करत इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकल्या. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी रचलेल्या 101 धावांची भागिदारीचा अपवाद वगळदा एकही भारतीय फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या भेदक मार्‍या समोर लोटांगण घातल्याचे चित्र होते.

विराट कोहलीने 58 तर अजिंक्य रहाणेने 51 धावांची झुंझार खेळी उभारली. या दोघांचे अपवाद वगळता भारताचे नऊ फलंदाज 73 धावांमध्ये बाद झाले. इंग्लंडच्या 245 धावांच्या आव्हानाचे पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच तीन गडी गमावावे लागले. चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताचा स्कोअर 3 बाद 46 होता.

यानंतर कर्णधार विराट कोहील आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे झुंजार खेळी केली. सलामीवीर लोकेश राहुल शून्य धावसंख्येवर बाद झाला. तर शिखर धवन 17 आणि पहिल्या डावामध्ये शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा 5 धावांवर बाद झाले. चौथ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडला फक्त 11 धावा करता आल्या. भारताला पहिल्या इनिंगमध्ये 27 रनची आघाडी मिळाली होती. मोहम्मद शमीनं दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला धक्का दिला आणि ब—ॉडला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तर सॅम कुरन रन आऊट झाला.

भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माला 2 विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॉस बटलरनं सर्वाधिक 69 रन केले तर जो रूटनं 48 आणि सॅम कुरननं आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन महत्त्वपूर्ण 46 रन केले.

LEAVE A REPLY

*