आ.हेमंत पाटील यांचा खान्देशवासियांना अभिमान

0
कापडणे / कापडण्याच्या क्रांतीकारी भूमीचा सामाजिक वसा जोपासणार्‍या येथील भूमिपुत्र व नांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील यांचा उभ्या खान्देशला सार्थ अभिमान आहे.
आपल्या गावासह जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याचे गौरवास्पद कार्य ते करीत आहेत, असे गौरवोद्वाार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी काढले.
कापडणे गावाचे सूपुत्र व नांदेडचे आ.हेमंत पाटील, मुंबई येथे कार्यरत असलेले राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपायुक्त शांतीलाल भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व खान्देशुकन्या अ‍ॅड.देवयानी डोणगावकर यांचा नागरी सत्कार येथे झाला. यावेळी डॉ.भामरे बोलत होते.

येथील ऐतिहासिक दरवाजा चौकात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील होते. यावेळी उद्योजक सरकारसाहेब रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, आ.कुणाल पाटील, आ.अनिल कदम, आ.उन्मेश पाटील, पोलीस उपायुक्त शांतीलाल भामरे,औरंगाबद जि.प.अध्यक्षा देवयानी डोंणगावकर, शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात, सेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, किरण शिंदे, किरण पाटील, हेमंत साळुंके, कॉग्रेसचे श्यामकांत सनेर, ज्ञानेश्वर भामरे, वाल्मीक दामोदर, भगवान पाटील, जळगाव शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, पंचायत समिती सदस्या उषाताई माळी, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ पाटील, संजय शर्मा, डॉ. सुशील महाजन, कापडणे सरपंच राजेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य रामकृष्ण खलाणे, माजी आ.शरद पाटील आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांची गावातुन मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली.

यात येथील व परिसरातील ग्रामस्थ उत्स्फुर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले. यानंतर भूमिपुत्रांचा सन्मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस उपायुक्त शांतीलाल भामरे, शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात, आ.उन्मेष पाटील, आ.अनिल कदम, आ.कुणाल पाटील, आ.हेमंत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या प्रास्तविकतुन माजी आ.शरद पाटील यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद केले.

बापु खलाणे यांनी अक्कलपाडा धरणाचे पाणी देवभाने धरणात टाकण्याची मागणी केली. देवभाने धरणात पाणी ठाकल्यांनंतर 50 गावातील शेतकर्‍यांना या पाण्याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी प्रास्तविकातुन मांडले यावेळी पुढे बोलतांना डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले की, कापडणे एक संघर्षमय व राजकीय केंद्रबिदू असलेले गाव आहे. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी असल्याचेही त्यांनी सांगीतले.

आ.कुणाल पाटील यांनी आ.हेमंत पाटील व पोलीस उपायुक्त शांतीलाल भामरे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्वार काढले. हेमंत पाटील यांचे कार्य आपल्या नजरेत भरते असे आमदार चाळीसगावचे आ.उन्मेष पाटील यांनी सांगितले. आपल्या कर्तृत्वाने हेमंत पाटील यांनी राजकारणात प्रगती केली आहे.

नांदेडमध्ये आपला एक वेगळा असा ठसा निर्माण केला आहे आपले कार्य त्यांनी संधोधित असेच चालू ठेवावे असे आ.अनिल कदम यांनी सांगितले. प्रास्तविकातुन माजी आ.शरद पाटील यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद केले तर बापु खलाणे यांनी अक्कलपाडा धरणाचे पाणी देवभाने धरणात टाकण्याची मागणी केली.

देवभाने धरणात पाणी टाकल्यानंतर 50 गावातील शेतकर्‍यांना या पाण्याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी प्रास्तविकातुन मांडले. यावेळी सन्मानपत्राचे वाचन धनश्री पाटील, संजय पाटील, जगन्नाथ पाटील व नितीन पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.रविंद्र पाटील व पंजाबराव पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

*