आ.राजूमामा भोळे यांच्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन – डॉ.सुनिल महाजन

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जळगाव शहराच्या विकासासाठी २५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विकास कामे करण्याच्या निश्‍चितीसाठी आ.राजूमामा भोळे यांच्या आग्रहास्तव समिती गठीत झाली आहे. परंतु या समितीत मनपाचे सत्ताधारी किंवा विरोधक असलेल्या भाजपच्या एकही पदाधिकार्‍यांचा समावेश नाही. त्यावरुन आ.राजूमामा भोळे यांच्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन दिसून येत असल्याचा खळबळ जनक आरोप माजी उपमहापौर डॉ.सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.  दरम्यान, आ.राजूमामांनी फुकटचे श्रेय लाटू नये, असा टोला देखील त्यांनी लगावला.

जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटीच्या निधीची घोषणा केली होती. त्यानुसार निधी वितरीत करण्याबाबत शासनस्तरावरुन अद्यादेश जाहीर झालेला आहे. परंतु या निधीवरुन आता श्रेय लाटण्याचा प्रकार सुरु झालेला आहे. याबाबत खाविआतर्फे माजी उपमहापौर डॉ.सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत भूमिका विषद केली.

jmc

ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री जळगावात आले असता, भाजप नगरसेवकांसह खाविआच्या तत्कालीन महापौरांनी जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून भेट घेवून निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी निधी देण्याची घोषणा केली.

निधी लवकर मिळावा, यासाठी ना.महाजन यांच्या माध्यमातून महापौर नितीन लढ्ढा यांनी वेळोवेळी ठराव, प्रस्ताव तयार करुन शासनस्तरावर पाठपुरावा केला. जळगाव शहराचा २५ कोटीचा निधी मिळाला. हे केवळ जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांचे श्रेय असल्याचे डॉ.सुनिल महाजन यांनी सांगितले.

तर प्रलंबित कामांसाठी पाठपुरावा का नाही ?

आ.राजूमामा भोळे यांना शहराचा विकासासाठी खरोखरच पुळका आहे तर मग विकासाचे अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी ते का पाठपुरावा करीत नाही? मुदत संपलेले १८ व्यापारी संकुलातील गाळे, समांतर रस्ते, शिवाजीनगरचा पुल, भोईटेनगर उड्डानपुलासाठी त्यांनी पाठपुरावा करावा.

आ.राजूमामांनी फुकटचे श्रेय लाटू नये !

शहराच्या विकासासाठी निधी मिळाला हे केवळ जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांचे श्रेय आहे. ते समान न्याय देतील. असा विश्‍वास आहे. परंतु निधीबाबत आ.राजूमामा भोळे यांनी फुकटचे श्रेय लाटू नये! असा टोला डॉ.सुनिल महाजन यांनी लगावला.

पक्षाच्याच सहकार्‍यांवर अविश्‍वास

जळगाव शहराच्या विकासासाठी मिळालेल्या २५ कोटीच्या निधीतून कामे निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. परंतु या समितीत महापालिकेचे पदाधिकार्‍यांचा समावेश नाही. आ.राजूमामा भोळे यांचा सत्ताधार्‍यांवर विश्‍वास नाही.

तर मग भाजपचेच त्यांचे ज्येष्ठ सहकारी असलेले वामनराव खडके किंवा गटनेता सुनिल माळी यांचा तरी समितीत समावेश करणे आवश्यक होते. परंतु त्यांचाही समावेश नसल्यामुळे आ.राजूमामा भोळे यांचा आपल्याच सहकार्‍यांवर विश्‍वास नाही. असे लक्षात येत असल्याचा आरोप देखील डॉ.सुनिल महाजन यांनी केला.

मिशन ५० नव्हे, १५ प्लस

आगामी महानगरपालिका निवडणूकीत आ.राजूमामा भोळे यांनी मिशन ५० प्लसचा निर्धार केला आहे. परंतु मिशन ५० नव्हे तर १५ प्लस राहिल. अशा शब्दात डॉ.सुनिल महाजन यांनी टिका केली.

LEAVE A REPLY

*