आ.खडसेंना आव्हान

0

जळगाव /जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्याचे खाते वाटप आज अध्यक्षांनी जाहीर केले.

विषय समित्यांमधुन देखील आ. खडसे समर्थक सदस्यांना डावलल्याने सदस्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

विषय समित्याच्या सदस्य निवडीचे सर्व अधिकार सर्वपक्षाच्या गटनेत्यांनी अध्यक्षांना दिले होते. गेल्या 15 दिवसांपासून दोन सभापती विना खात्याचे असतांना आज अध्यक्ष उज्वला पाटील यांनी पक्षातील प्रमुख मंडळीच्या आदेशावरून यादी जाहीर केली.

पूर्वीपासून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांकडे बांधकाम व अर्थ समितीचे सभापती पद देण्यात येत असते.

परंतु यावेळी विषय समित्यांचे खातेवाटपावेळी आ. एकनाथराव खडसे समर्थक असलेले उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांना डावलून नियमबाह्य पध्दतीने खाते वाटप जाहीर करून बांधकाम समिती सभापती पद रजनी चव्हाण यांच्याकडे,

तर अर्थ समितीचे सभापतीपद पोपट भोळे यांच्याकडे देण्यात आले असून उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांना केवळ कृषि व पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीचे सभापती पद देण्यात आले आहे.

त्यामुळे सत्ताधार्‍यांमधील गटबाजी दिसून आली आहे.

दरम्यान खातेवाटप नियमबाह्य पध्दतीने झाली असून याबाबत वरिष्ठांची चर्चा करणार असल्याचे उपाध्यक्षांनी दै. देशदूत शी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

*