आ.खडसेंचे स्विय्यसहाय्यक व दमानीया यांच्यात खडाजंगी

0

मुक्ताईनगर |  वार्ताहर :  माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे स्वियसहाय्य्क योगेश कोलते व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांच्यात तहसीलदारांच्या दालनात खडाजंगी झाली.

येथील वार्ड १ मधील ग्रामपंचायत मालकीच्या १४८३ क्षेत्रङ्गळापैकी ३०० चौरसङ्गूट जागा ग्रा.पं. दप्तरी भोगवटा असलेले रोहीदास दिनकर शिरसाठ यांचे रहाते घराचा सार्वजनिक रस्ता काही राजकीय पुढार्‍यांनी संरक्षण भिंत बांधुन पूर्णपणे बंद केलेला आहे न्याय हक्कासाठी दि.७ मार्च पासुन तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास शिरसाठ हे मंडप टाकून बसलेले आहे.

शिरसाठ यांना न्याय मिळावा यासाठी भारीप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर हे कोर्टाच्या कामानिमित्त मुक्ताईनगरात आलेल्या अंजली दमानिया यांना घेवून उपोषणस्थळी दुपारी १२.३० वाजे दरम्यान पोहचले. त्यांचे सोबत गजानन मालपुरे हे देखील उपस्थित होते. उपोषणकर्ते शिरसाठ यांना बरोबर घेवुन दमानिया यांनी तहसिलदारांचे दालन गाठले.

हे प्रकरण गटविकास अधिकारी यांच्या अखत्यारीत असल्याने तहसिलदारांनी गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडे, ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांना तहसील कार्यालयात बोलाविण्यात आले. तत्पुर्वी दालनामध्ये दमानिया व उपोषणकर्ते तहसीलदार जितेंद्र कुंवर यांचेशी चर्चा करीत असताना माजी मंत्री आ. खडसे यांचे स्वियसहाय्यक योगेश कोलते हे तहसीलदारांचे दालनात आले व तहसिलदारांच्या बैठक व्यवस्थेजवळ असलेल्या खुर्ची जवळील खुर्चीवर बसले.

यावर दमानिया यांनी आक्षेप घेतला व तहसिलदारांचे दालन हे दालन नसुन हे न्यायालय आहे, त्यामुळे कोलते यांनी येथे बसुन अपमान केला आहे, असा आरोप दमानिया यांनी केला. यामुळे वातावरण अधिकच चिघळले.

तात्काळ तहसिलदारांनी पोलिस उपविभागीय अधिकारी समीर शेख, पोलिस निरीक्षक अशोक कडलग, सहाय्यक निरीक्षक हेमंत कडुकार, उपनिरिक्षक वंदना सोनुने व चार ते पाच पोलिस कर्मचारी दालनामध्ये धावुन आले. दालनामध्ये सुरु असलेला गोंधळ पाहुन दालनाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. गोंधळाच्या चर्चे दरम्यान बी.डी.ओ. लोखंडे यांनी स्थळ पंचनामा करण्याचे आदेश ग्रामविकास अधिकारी बोदडे यांनी दिले.

पत्रकारांशी बोलतांना कोलते यांनी सांगितले की, माजी मंत्री आ. खडसे यांना अधिवेशनासाठी महसूल संदर्भातील आवश्यक माहीती द्यायची असल्यामुळे तहसिल कार्यालयात आलो होतो. दालनात सुरु असलेल्या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नसुन खुर्चीवर बसल्याच्या दमानियांच्या आरोपाचे खंडन करीत मी गेल्या वीस वर्षापासून स्विय सहाय्यकाचे काम करीत आहे.

शासनाचे मानधन घेत आहे त्यामुळे कोठे बसावे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तसेच जवळपास पाच लाख लोकांना तोंड द्यावे लागते, यासाठी निवडुन यावे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी गजानन मालपुरे यांना लगावला.

LEAVE A REPLY

*