Type to search

धुळे

आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७२ जणांचे रक्तदान

Share

धुळे | धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि.१८ सप्टेंबर रोजी एसएसव्हीपीएस साहित्य, कला व वाणिज्य महाविद्यालय येथे  युवक कॉंग्रेसच्यावतीने  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७२ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.दरम्यान जिल्हयात विविध उपक्रमही घेण्यात आले.

समाजाप्रति संवेदना व्यक्त करीत आ.कुणाल पाटील यांनी आपल्या वाढदिवशी हारतुर्‍यांच शुभेच्छांचा कार्यक्रम रद्द केला होता.मात्र वाढदिवसानिमित्त युवक कॉंग्रेस तसेच विविध सामाजिक संस्थांच्यावतीने व कार्यकर्त्यांनी धुळे तालुक्यात प्रबोधन व समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले होते.

युवक कॉंग्रेसतर्फे धुळे येथे रक्तदान शिबीर घेतले.यावेळी झालेल्या शिबीरात तालुक्यातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत रक्तदान केले. शिबीराचे उद्घाटन समारंभाला खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, बुरझडचे माजी सरपंच एन.डी.पाटील,प्राचार्य मनोहर पाटील, कृऊबा संचालक राजेंद्र भदाणे, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, युवक कॉंग्रेसचे हर्षल साळुंके, राजीव पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील,सुतगिरणीचे संचालक संदिप पाटील, सतिष रवंदळे, प्रा.अभय खैरनार, प्रा.अमोल बच्छाव, आरोग्यसेवक गोकुळ राजपूत, संदिप पाटील, ज्ञानेश्‍वर सोनवणे यांच्यासह युवक कॉंग्रेसचे  पदाधिकारी उपस्थित होते.रक्तदान शिबीरासाठी हिरे वैद्यकिय महाविद्यालय आणि जवाहर मेडीकल फौंडेशन यांचे सहकार्य लाभले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!