Type to search

धुळे

आषाढीनिमित्त विठ्ठल मंदिर सजले

Share

धुळे । आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरे सजविण्यात आली असून मंदिरांवर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर सजविण्यात आले आहे. हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान असल्यामुळे या मंदिरात आषाढी व कार्तिकी एकादशीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेवून या ठिकाणी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून बांबू लावून पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी मनोरंजनाचे साधने लावण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात पुजेचे साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी होते त्यामुळे येथे चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येतो.

सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच
धुळे शहरातील मालेगाव रोडलगत गाणू परिवाराने 1947 मध्ये विठ्ठल मंदिराची उभारणी केली. हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाते. आषाढी व कार्तिकी एकादशीला या मंदिरात यात्रा भरते. यात्रेमुळे गर्दी होत असल्यामुळे संरक्षण कठडे उभारण्यात आले आहेत. शिवाय काही गैरप्रकार होवू नयेत म्हणून मंदिरा परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

पोलिस बंदोबस्त
शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे पहाटेपासून दर्शनासाठी मंदिरात गर्दी होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!