आश्रमशाळांमधील रोजंदारी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ

0
नवापूर / शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तासिका पद्धतीने प्रशिक्षित व अप्रशिक्षित मानधनात राज्य सरकारने वाढ केली आहे.
राज्यातील तीन हजार कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे. सदर नवीन दर 1 जुन 2017 पासून लागू होणार आहे.
मानधनात वाढ करण्यासाठी रोजंदारी संघर्ष संघटनेच्या प्रयत्नानंतर यश मिळाले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर यांनी दिली.
आदिवासी विकास विभागामार्फत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तासिका तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रकल्प स्तरावरून प्रशिक्षित व अप्रशिक्षित शिक्षक नेमले जातात.
या आश्रमशाळेत अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या रोजंदारी/तासिका कर्मचार्‍यांना अतिशय अत्यल्प दरात तासिका पद्धतीने काम करत होते.

मानधनात वाढ व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3/4 कर्मचारी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलने, मोर्चा काढून पाठपुरावा केल्याने रोजंदारी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ मिळून देवून संघटनेने पहिला यशाचा टप्पा पार पाडला आहे.

या निर्णयाने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार 100 शिक्षक व शिक्षकेतर रोजंदारी कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

शासन सकारात्मक असून मंत्रालय स्तरावर दि.6 एप्रिल 2017 च्या मुख्यमंत्री व संबंधित आदिवासी विकास विभाग यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार 3 वर्षापुढील रोजंदारी/तासिका कर्मचार्‍यांचे सेवा सुरक्षा व कायम सेवा समायोजनची कार्यवाही सुरू आहे.

आयुक्तालयीन एका पत्रामुळे प्रकल्प अधिकारी यांनी मुख्याध्यापकांना नवीन 2017-18या शैक्षणिक वर्षात कुठलाही रोजंदारी कर्मचारी नियुक्त करण्यात येवू नये, असे निर्देश देत रोजंदारी कर्मचार्‍यांना डावलण्याचा प्रकार सुरू आहे, अशी भावना कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*