आशियाई स्पर्धेत नीरज चोप्राला पराभवाचा धक्का

0
जकार्ता । आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणार्‍या भालाफेकपटू नीरज चोप्राला सर्वोत्तम कामगिरी करूनही मानाच्या डायमंड लीग स्पर्धेत पदकावाचून वंचित राहावे लागले. भारताच्या 20 वर्षीय नीरज या स्पर्धेत 85.73 मीटर भाला फेकून आठ जणांच्या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला. जर्मनीच्या थॉमस रोहलेरने85.86 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

नीरजने पाचव्या फेरीपर्यंत तिसरे स्थान अबाधित राखले होते. त्यामुळे कांस्यपदकाच्या शर्यतीत होता, पण जर्मनीच्या रोहलरने नीरजच्या तुलनेत केवळ 0.03 मीटर अंतराने अधिक भालाफेक फेकला. नीरज या स्पर्धेत स्वतःच्या सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. नीरजने आपल्या पहिल्या फेकीतच 83.46 मीटर भाला फेकून आपले सुवर्णपदक निश्चित केले होते. तर तिसर्या प्रयत्नात 88.6 मीटर भालाफेक करून विक्रम प्रस्थापित केला. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

LEAVE A REPLY

*