आशा स्वयंसेविकांमुळे माता व बाल मृत्यूदर घटला : सौ. गडाख

0

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- आशा स्वयंसेविकांच्या कृतिशील आरोग्य सेवेमुळेच माता व बाल मृत्यूदर कमी झाला आहे. स्वयंसेविकांना वाढीव मानधनासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही पंचायत समिती सभापती सुनिताताई गडाख यांनी दिली. शनिशिंगणापूर येथे आशा गुणगौरव कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

 

यावेळी पंचायत समिती उपसभापती सौ. राजनंदिनी मंडलिक, गटविकास अधिकारी सुधाकरमुंढे, बाळासाहेब सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे, पंचायत समिती सदस्या सौ. मीनाक्षी सोनवणे, सौ.वैशाली एडके, शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्थ सौ.शालिनीताई लांडे आदिनाथ शेटे,दीपक दरंदले व्यासपीठावर होते.

 

आशा स्वयंसेविका तालुका संघटक श्रीमती लताताई आहेर यांनी स्वागत केले. आरोग्य अधिकारी डॉ.कसबे यांनी प्रास्ताविक केले उपस्थित आशा स्वयंसेविकांना छत्री व साड्यांचे वाटप तसेच उत्कृष्ट आशा गुणगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 

यावेळी सौ. गडाख म्हणाल्या, आशा स्वयंसेविकांना दिला जाणारा कामावर आधारीत मोबदला दीडहजार रुपयांपर्यंत देखील जात नाही. आशा स्वयंसेविकांना वाढीव मानधन मिळावे यासाठी आपण शासकीय व प्रशासकिय पातळीवर पाठपुरावा करू.

गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, बाळासाहेब सोनवणे, शारदा काळे, अमोल लोढे, अनिता तोडमल, शनैश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त आदिनाथ शेटे, श्रीमती लताताई आहेर,मायाताई शेंडे, मंगल नगरे, संजय खरे यांनी आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे कौतुक केले. पर्यवेक्षिका रोहिणी कुलट यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*