आव्हाणे दंगलीतील चौघांना पोलीस कोठडी

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-आव्हाणे दंगलीतील चौघांची न्यायालयाने दि. 15 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
आव्हाणे येथे दि. 4 जुन रोजी झालेल्या दोन गटातील हाणामारी नंतर मोठी दंगल उसळली होती.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दंगलीचा व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील संशयीत बंटी उर्फ दत्तु जोंगेद्र अरूण साळुंखे (वय 27), अरूण बुधा उर्फ गोविंदा साळुंखे (वय 55), राजेंद्र कालीदास सोनवणे (वय 35), लक्ष्मीकांत अरूण साळुंखे (वय 23, सर्व रा. आव्हाणे) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

त्यांना न्या.एम.एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची दि.15 जुनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. यावेळी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. निखील कुलकर्णी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*