जामनेर आवारातील मोजणी पूर्ण करण्यासाठी २६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद

0

जामनेर | प्रतिनिधी : बाजार समिती आवारात सध्या तुरखरेदी करण्यासाठी जवळपास १५० ट्रॅक्टर उभे असुन या शनिवार पर्यंत तुरीची मोजणी पूर्ण होईल त्यानंतरच नविन मालाची खरेदी केली जाईल. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी तुर्त २६ मार्च पर्यंत बाजार समिती आवारात तूर खरेदीसाठी आणू नये . २७ मार्च पासुन त्यांनी माल आणावा असा निर्णय शेतकी संघाने घेतला असल्याची माहिती शेतकी संघ अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनी जामनेर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी कृउबा सभापती तुकाराम निकम, उपसभापती बाबुराव गवळी, डॉ. सुरेश मन्साराम पाटील उपस्थित होते.
बावीस्कर पुढे म्हणाले की, तुर खरेदीसाठी आवक वाढली असुन नाफेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. यासाठी हमालाची संख्या वाढविण्यात आली असुन बारदान ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

तुरीचा साठा करण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करण्यात आली असुन तुर मोजणीसाठी दररोज चार काटे कार्यरत आहेत. रविवारीसुध्दा खरेदी करण्याचे काम सुरु असुन आता पर्यंत जवळपास दिड हजार क्विंटल तुर खरेदी आपण केली आहे. परंतु अजुनही बाजार समिती आवारात सुमारे दिडशे ट्रॅक्टर उभे आहेत.

ही मोजणी झाल्याशिवाय पुढच्या येणार्‍या मालाची मोजणी करता येणार नाही दिडशे ट्रॅक्टरची मोजणी जवळपास २६ मार्च पर्यंत पुर्ण होईल तो पर्यंत नविन येणार्‍या वाहनांना इतके दिवस थांबावे लागेल.

त्यांना ६/७ दिवस विनाकारण ताटकळत बसावे लागेल व शेतकर्‍यांनाच इतके दिवसाचा भाड्याने ट्रॅक्टर आणल्यास भाडे भरावे लागेल म्हणुन त्यांचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी नविन तुर घेऊन येणार्‍या वाहनांना २६ मार्च पर्यंत प्रवेश देण्यात येणार नाही त्यांना २७ मार्च पासुन प्रवेश मिळेल.

तरी शेतकर्‍यांनी २७ मार्च पासुन तुर खरेदीसाठी आणावी काही शेतकरी आवारातच व्यापार्‍यांना तुर विकतात व हीच तुर संबंधीत व्यापारी शेतकर्‍यांचे उतारे दाखवुन विकतो याला आळा बसावा यासाठी ही लवकरच कठोर उपाय करु असेही शेतकी संघ अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*