आळंदी धरण कालव्यांच्या दुरूस्तीसाठी 4.5 कोटी निधी मंजूर

0

नाशिक : आळंदी माध्यम प्रकल्पाच्या धरण आणि दोन्ही कालव्यांच्या विशेष दुरूस्ती कामांतर्गत राज्य शासनाच्या जलसंंपदा विभागाने सुमारे 4.35 कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. आळंदी धरण बांधल्यानंतर सुमारे 30 वर्षानंतरच प्रथमच दोन्ही कालव्यांच्या विशेष दुरूस्ती करिता एव्हढा मोठा निधी आ. बाळासाहेब सानप यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने मंजुर केला असुन यामुळे सुमारे 400 हेक्टर क्षेत्राची पुनर्स्थापना होणार आहे.

आळंदी माध्यम प्रकल्प म्हणुन संबोधला गेलेल्या आळंदी धरणाची क्षमता 27.48 दश लक्ष घन मीटर इतकी असुन या धरणाचे काम 1983 मध्ये सुरू होऊन 1993 मध्ये पुर्ण झाले होते. त्यानंतर हा प्रकल्प सिंचन व्यवस्थापनाकडे 1994 मध्ये हस्तांतरीत करण्यात आला होता. या प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र 6296 हेक्टर असुन कालवे व वितरकांची लांबी 46.50 कि. मी. इतकी आहे. हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर गेल्या 25 ते 30 वर्षात याच्या धरण कालवे भराव मजबुतीकरण, बांधकामे दुरुस्त, सेवापथ दुरुस्ती आदी कामे पुर्ण झालेली नव्हती.

यामुळेच उर्वरित कामे पुर्ण करुन या धरणाखाली अजुन 400 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी यासंदर्भातील प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविला होता. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी बांधण्यात आलेल्या आळंदी धरणाचे काम पुर्ण होऊन त्यांचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना व्हावा यासाठी आ. बाळासाहेब सानप यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केला होता. या अगोदर आळंदी कालव्यांचे दुरुस्ती काम करण्यासाठी आडगांव परिसरातील शेतकर्‍यांनी पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याची दखल घेत जलसंपदा मंत्री मंहाजन यांनी आळंदी मध्यम प्रकल्पाच्या धरण व कालवे दुरुस्तीच्या कामासाठी 4 कोटी 35 लाख 13,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुली दिली आहे. या धरण व कालव्यांच्या दुरूस्तीसाठी भरीव निधी मंजूर झाल्याने आता आडगांव, दरी, मखमलाबाद, मातोरी, म्हसरुळ, चांदशी, सय्यद पिंपरी, जलालपुर आदी परिसरातील आणखी 4000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला. आ.सानप यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न मार्गी लागला असुन या भागातील शेतकर्‍यांनी आ. सानप यांचे आभार मानले. लवकरच हे काम सुरू झाल्यास धरणातून होणार्‍या गळतीच्या माध्यमातून वाया जाणारे पाण्याची मोठी बचत होणार आहे.

LEAVE A REPLY

*